बांधकाम परवानगीतून भरीव उत्पन्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

पिंपरी - महापालिकेला बांधकाम परवानगीतून गेल्या सात वर्षांत चांगली उत्पन्नवाढ मिळाली आहे. १९० कोटींपासून उत्पन्नाचा आलेख ३२१ कोटींपर्यंत गेला आहे. त्याशिवाय विविध गृहप्रकल्प, चाळीतील घर, बंगले व अन्य बांधकामांसाठी परवानगी घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या सात वर्षांत एकूण ८ हजार ८८९ बांधकामांना परवानगी दिली आहे. 

शहरात गेल्या काही वर्षांत नवीन बांधकामांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील विविध भागांमध्ये नवनवे गृहप्रकल्प सुरू झाले आहेत. सदनिकांचे दर विभागानुसार प्रतिचौरस फुटाला तीन ते सात हजार रुपयांपर्यंत आहेत. तरीही नागरिकांकडून घरांना कायम मागणी आहे. हक्काचे घर आणि गुंतवणूक, अशा दोन उद्देशाने घरे खरेदी केली जात आहेत. वाकड भागात गेल्या सात वर्षांत सर्वाधिक ९०१ गृहप्रकल्प व अन्य बांधकामांसाठी परवानगी देण्यात आली आहे.

बांधकाम परवानगी विभागाला चालू आर्थिक वर्षात आत्तापर्यंत ३२१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. अद्याप आर्थिक वर्ष पूर्ण होण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी आहे. त्यामुळे निश्‍चित केलेले ३४० कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण होईल. बांधकाम क्षेत्रात मंदीचे सावट असले, तरी घरे सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात आहेत. नागरी सुविधा चांगल्या आहेत. पर्यायाने, नवे गृहप्रकल्प होत आहेत. त्यामुळे बांधकाम परवानगीचे उत्पन्नदेखील स्थिर आहे.
- एम. डी. निकम, कार्यकारी अभियंता

Web Title: pimpri new pune news construction permission income municipal