अमृतांजन पूल न पाडण्याच्या ८० टक्के सूचना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

पुणे - लोणावळा ते खंडाळा दरम्यानच्या द्रुतगती मार्गाला जोडणारा तब्बल १८७ वर्षे जुना असलेला अमृतांजन पूल धोकादायक झाल्यामुळे पाडून नवा पूल बांधण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. तत्पूर्वी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) कायदेशीर बाब म्हणून नागरिक, संस्थांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. एकूण ३० ते ४० हरकती-सूचना आल्या. त्यापैकी ८० टक्के सूचना या हा पूल पाडू नये, अशा आल्यामुळे ‘एमएसआरडीसी’पुढील अडचणी वाढल्या आहेत. 

लोणावळा येथील अमृतांजन पूल १८३० मध्ये ब्रिटिश अधिकारी कॅप्टन ह्यूज यांनी एका वर्षात बांधला होता. त्यांनीच लोणावळा-खंडाळा घाटातील रेल्वेमार्गदेखील उभारला होता. हा पूल स्टंटमुळे नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. ‘सेल्फी पॉइंट’ असल्यामुळे दुचाकी, चारचाकी गाड्या लावून नागरिकांकडून फोटो काढण्यात येतात. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे वाढत्या अपघातांची संख्या, प्रचंड वाहतूक कोंडीमुळे हा जुना पूल पाडून, नवा पूल उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून घेण्यात आला आहे.

महसूलकडून मागविला अहवाल  
अमृतांजन पूल माझ्या मालकीच्या जागेत असल्यामुळे हा पूल पाडू नये, अशी कायदेशीर नोटीस श्री नाईक यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मुंबईच्या कार्यालयात पाठविली आहे. या नोटिशीची गंभीर दखल घेत ‘एमएसआरडीसी’कडून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागाकडून जागेच्या संदर्भात अहवाल मागविला आहे. संबंधित व्यक्तीचा या जागेशी काय संबंध आहे, हा अहवाल आल्यावर स्पष्ट होईल.

पूल पाडण्यासाठी ३० ते ४० नागरिक व संस्थांनी सूचना पाठविल्या आहेत. ८० टक्के सूचना या पूल पाडू नये, अशा आहेत. दरम्यान, रेल्वेने पाडण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे पूल पाडण्याची पुढील कार्यवाही आगामी काळात केली जाईल 
- प्रशांत औटी, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ.

Web Title: pimpri news Amrutanjan bridge