गाडा मालकांवरील गुन्हे मागे घेणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

पिंपरी - राज्यातील बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठविण्यासाठी गाडामालक आणि शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. त्यादरम्यान, अनेक शेतकऱ्यांवर खटले दाखल केले आहेत. मात्र, बैलगाडा बंदी उठविण्याचा निर्णय लवकरच होणार असल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. याबाबत राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेणार आहे, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली. 

राज्यातील बैलगाडा गाडामालक व शेतकऱ्यांनी सनदशीर मार्गाने आंदोलने केली आहेत. गाडामालकांवर दाखल खटल्यांबाबत राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, खटले मागे घ्यावेत, अशी आग्रही मागणी केली आहे. बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठविण्याबाबत राज्य सरकारने पाठविलेल्या विधेयकावर तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी (ता. २२) स्वाक्षरी केली. केंद्र सरकारच्या गृह खात्याकडे संबंधित विधेयक दाखल झाले आहे. त्यानंतर लगेचच मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमदार लांडगे यांनी भेट घेतली. त्या वेळी बैलगाडामालक आणि शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. आमदार लांडगे म्हणाले, ‘‘राज्यातील बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात, या मागणीसाठी सात वर्षांपासून विविध बैलगाडामालक व प्रेमी संघटना; तसेच सामान्य शेतकऱ्यांनी सनदशीर मार्गाने खेड, शिरूर, आंबेगाव, चाकण, जुन्नर आदी भागांत प्रभावी आंदोलने केली. राज्यातील अन्य भागांतही आंदोलने केली. या आंदोलनादरम्यान स्थानिक पोलिसांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून खटले भरले आहेत. त्या शेतकऱ्यांना आता न्याय देण्याची गरज आहे.’’

Web Title: pimpri news Bhosari MLA Mahesh Landge