शहर भाजपचे २८ पासून घर चलो अभियान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

पिंपरी - भाजपच्या कामांची माहिती घरोघरी पोचविण्याच्या दृष्टीने भाजपच्या वतीने २८ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान घर चलो अभियान राबविण्यात येणार आहे. 

पिंपरी - भाजपच्या कामांची माहिती घरोघरी पोचविण्याच्या दृष्टीने भाजपच्या वतीने २८ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान घर चलो अभियान राबविण्यात येणार आहे. 

अभियानाचे प्रमुख समन्वयक व प्राधिकरण चिंचवड मंडलाची जबाबदारी थोरात यांना देण्यात आली असून, संजय मंगोड्‌कर-चिंचवड स्टेशन, दापोडी, बाबू नायर-किवळे थेरगाव, माउली थोरात - सांगवी काळेवाडी, प्रमोद निसळ- निगडी चिखली, सारंग कामतेकर- भोसरी चऱ्होली, राजेश पिल्ले- युवा मोर्चा, उमा खापरे- महिला मोर्चा, सदाशिव खाडे- अनुसूचित, अल्पसंख्याक, व्यापार व कामगार आणि सचिन पटवर्धन यांच्याकडे उर्वरित आघाड्यांची जबाबदारी दिली आहे. भाजपचा सहा एप्रिलला वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन मुंबई बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्‍स (बीकेसी) येथे होणार असून, त्यासाठी शहरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मुंबईला नेले जाणार आहे. 

बूथचे मजबुतीकरण करणार
प्रबोधनात्मक कामासाठी प्रभागातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे गट करण्यात येणार असून, हे गट घरोघरी जाऊन विकास योजनांची माहिती देतील. शहरातून तेराशे बूथ मजबुतीकरणाचा निर्धार पक्षाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती अमोल थोरात यांनी दिली.

Web Title: pimpri news bjp chalo abhiyan