साखळी चोरीच्या आठवड्यात तीन घटना

रवींद्र जगधने
सोमवार, 31 जुलै 2017

पिंपरी - शहरात पादचारी किंवा दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून धूम स्टाईलने पसार होण्याची आठवड्यातील तिसरी घटना घडली आहे. साखळी चोरी (चेन स्नॅचिंग) ही चोरट्यांसाठी ‘डाव्या हाताचा मळ’ झाला असून यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

शहरात एका आठवड्यात मंगळसूत्र हिसकावण्याच्या तीन घटना घडल्या असून इतर गुन्हे उघडकीस आणण्यात शहरातील पोलिसांना बऱ्यापैकी यश येत असले, तरी साखळी चोरीच्या घटनांचा सुगावा लावण्यात मात्र, मोठी अडचण येत असल्याचे खुद्द पोलिस प्रशासनाचेच म्हणणे आहे. 

पिंपरी येथून चिखलीकडे पतीसह दुचाकीवरून जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरांनी महिलेच्या गळ्यातील ४० हजारांचे मंगळसूत्र हिसका मारून चोरून नेले. ही घटना पिंपरी एमआयडीसीमध्ये एचवायटी कंपनीसमोर सोमवारी (ता. २४) रात्री आठच्या सुमारास घडली. तर दुसऱ्या घटनेत त्रिवेणीनगर येथे एका महिलेचे ६० हजारांचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसका मारून लंपास केले. तिसऱ्या घटनेत नागपंचमीनिमित्त पूजा करून घरी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील साडेपाच तोळ्याचे गंठन व दोन तोळ्याचे मंगळसूत्र असे साडेसात तोळ्यांचे सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसका मारून चोरून नेले. ही घटना गुरुवारी (ता. २७) दुपारी तीनच्या सुमारास मोशी प्राधिकरणातील संत नगरमधील साहिर व्हिला बंगल्यासमोरील रस्त्यावर घडली. 

एखादी महिला रस्त्याने जात असताना मोटारसायकलवरून तोंडाला रुमाल बांधून चोरटे भरधाव येतात. मंगळसूत्र हिसकावून पळही काढतो. त्या धामधुमीत महिलेला काहीच सुचत नाही. काही कळायच्या आतच तो चोरटा पसार झालेला असतो. कमी गर्दी असलेली ठिकाणे हे चोरटे निवडतात. त्या दुचाकीचा क्रमांक अथवा त्या चोरट्याचा चेहरा त्या महिलेने बघितलेला नसतो. त्यामुळे अशा घटना उघडकीस येण्यास मोठी अडचण येते.  

शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांसह संयुक्त मोहीम राबवत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. हे गुन्हेगार शहराच्या बाहेरील असतात. गुन्हा करून ते पसार होतात. 
- गणेश शिंदे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ तीन

Web Title: pimpri news Chain stolen