वह्या-पुस्तकांसाठी दुकानांत गर्दी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

पिंपरी - सीबीएसई पॅटर्नच्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी, मराठी आणि इंग्रजी माध्यमातील बहुतांश शाळा १५ जूनपासून सुरू होत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत. 

पाठ्यपुस्तके, वह्या, स्कूल बॅग, छत्री, रेनकोट, कंपास पेटी, लंच बॉक्‍स, पाण्याची बॉटल, स्केच पेन, एक्‍झाम पॅड अशा शाळेशी निगडित वस्तूंच्या खरेदीसाठी पालक व विद्यार्थ्यांनी रविवारी (ता. ३) दुकानांमध्ये गर्दी केली होती. यंदा पहिली व आठवीचा अभ्यासक्रम बदलल्याने बाजारात ही पुस्तके दाखल झालेली नाहीत, असे प्रिन्स स्टेशनरीचे दिनेश रिजवानी यांनी सांगितले. 

कंपास संचात वेगळेपण
पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, स्केल असे एकत्रित साहित्याचे संच अनेक दुकान, मॉलमध्ये उपलब्ध आहेत. अर्धा डझनापासून हे संच सुरू होतात. यातही वेगळेपण आणण्याचा प्रयत्न विक्रेत्यांनी केला आहे. काही कंपन्यांनी असे संच बाजारात आणले आहेत. त्याची किंमत ६० पासून साडेतीनशे रुपयांपर्यंत आहे.

पुस्तकांचा संच व दर 
 इयत्ता दुसरी ते पाचवी - २५० रुपये
 सहावी व सातवी -४०० रुपये
 नववी : ५५० रुपये
 दहावी : ६१५ रुपये 

वह्यांचा दर (प्रतिडझन)
 दोनशे पानी - ३८० ते ४२०
 ए-फोर आकारातील - ३६० ते ६६०
 शंभर पानी - १८० 

इतर साहित्य (रुपयांत)
 छत्री - १५० ते १५०० रुपये
 पाण्याची बाटली - ५० ते १६० 
 जेवणाचा डबा - ५० ते २५० 
 रेनकोट - १५० ते ४०० रुपये

Web Title: Pimpri news Crowd in bookstores