सायबर गुन्ह्यांचा वाढता आलेख

सायबर गुन्ह्यांचा वाढता आलेख

बॅंकेतून बोलत आहे, असे भासवून क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा बॅंक खात्याची गोपनीय माहिती घेऊन बॅंक खात्यातून पैसे काढून घेण्याचे व इतर सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यात पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील गुन्ह्यांचा आलेख वाढताना दिसत आहे. 

सावधानतेची गरज
ऑनलाइन आर्थिक फसवणूक, सोशल मीडियावरून बदनामी आदींसह इतर माहिती तंत्रज्ञान बाबतीत होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास पुणे पोलिसांची सायबर गुन्हे शाखा करते. या शाखेकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातील काही गुन्ह्यांचा तपास होतो, तर अनेक गुन्ह्यांचा तपास लागतच नाही. कारण या गुन्ह्यात आरोपींपर्यंत पोचण्यासाठी कोणताच पुरावा मिळत नसल्याचे पोलिस अधिकारी सांगताहेत. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान युगात, कॅशलेस व्यवहारांच्या युगात सावध राहण्याची गरज आहे. 

सायबर सेलचे मनुष्यबळ 
    पोलिस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, 
वरिष्ठ निरीक्षक - १
    सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक - १४
    कर्मचारी - ४०
    सायबर सेलचे अधिकारी व 
कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण
    सायबर तज्ज्ञाची सायबर गुन्हे शाखेत कमतरता

गुन्हे होतात कोठून 
    ओटीपी मागवून ऑनलाइन पैसे पळवणे :
    झारखंड, बिहार 
    नोकरी, लॉटरी, विमा, कर्ज व वधू-वर सूचक याबाबतची फसवणूक : 
    दिल्ली, गाझियाबाद, नोएडा

२०१७ या वर्षात ५० आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल, ९५ आरोपींना अटक
एक लाखाच्या पुढील फसवणुकीचा तपास सायबर शाखेकडे.
फसवणुकीतील अनेक आरोपी कमी शिक्षित
८५ टक्के गुन्ह्यांत हिंदीभाषिकांचा सहभाग
सरकारी योजनांचाही फसवणुकीसाठी वापर

ऑनलाइन व्यवहारांबाबत जागृती कमी असल्याने सतर्कता बाळगली जात नाही. लॉटरी, ऑफर आदी आमिषाला अनेक जण बळी पडतात. तसेच नागरिकांनी बॅंक व विविध संस्थांकडून मिळणाऱ्या सूचनांकडे लक्ष देण्याची गरज आहे. 
- सुधीर हिरेमठ, पोलिस उपायुक्त, सायबर गुन्हे शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com