‘डेअरी फार्म बंद’विरोधात आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

पिंपरी - संरक्षण विभागाने देशभरातील मिलिटरी डेअरी फार्म बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात ‘खडकी, पिंपरी सिव्हिलियन एम्प्लॉइज मिलिटरी फार्म ट्रेड युनियन’ने पिंपरी आंबेडकर चौकात बुधवारी (ता. २३) आंदोलन केले. पिंपरी येथील मिलिटरी फॉर्ममधील कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. 

या वेळी आंदोलकांनी ‘गो हमारी दाता हैं, गो हमारी माता हैं’, ‘मिलिटरी फार्म बंद, तीनसो वर्कर्स बेघर’, ‘गो बचाओ, देश बचाओ’, ‘वंदे मातरम्‌...’ आदी घोषणा दिल्या. दीड ते दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे चौकातील वाहतूक काहीशी विस्कळित झाली. 

हरिशंकर यादव, राजेश यादव, मंगेश यादव, दिलीप यावर, देवेंद्र यादव, डॉ. दत्तात्रेय कांबळे, आझाद यादव, रेखा साळुंके, उषा भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. याबाबत रमेश यादव  म्हणाले, ‘‘ब्रिटिश सरकारने १८८९ मध्ये मिलिटरी फार्म ही स्वायत्त संस्था सुरू केली. या संस्थेचे देशभरात एकूण ३९ फार्म असून, त्यामध्ये २५ हजारांहून अधिक संकरित गायी आहेत. या संस्थेने भारतीय लष्कराला अविरतपणे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा केला. हे फार्म बंद झाल्यामुळे होलस्टिन फ्रिजन आणि साहिवाल जातींच्या गायींचे अस्तित्व धोक्‍यात येणार आहे. चार हजारांहून अधिक हंगामी मजूर बेघर होणार आहेत, तर १२ हजारांहून अधिक कर्मचारी बेरोजगार होणार आहेत. परिणामी त्यांचे कुटुंबीय अडचणीत येणार आहेत. एकीकडे केंद्र सरकार गोमातेच्या संवर्धनासाठी नागरिकांना प्रोत्साहन देत असताना दुसरीकडे स्वतःकडील गोशाळा सांभाळण्यास असमर्थता दर्शवत आहे. तरी सरकारने सर्व बाजूने विचार करून हा निर्णय मागे घ्यावा.’’

Web Title: pimpri news Dairy Farm agitation