गुन्हेगाराचा कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

देहूरोड  - सराईत गुन्हेगाराने रविवारी (ता. 25) देहूरोड पोलिस ठाण्याच्या कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न केला. अविनाश अरुण खंडागळे (वय 22, रा. गंगानगर नेवासा, अहमदनगर) असे त्याचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडागळेने ब्लॅकेटची एक किनार काढून कोठडीच्या चौकटीच्या लोखंडी गजाला त्याची गाठ मारली. दुसऱ्या टोकाने स्वतःच्या गळ्याला गाठ मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिस नितीन भीमसेन पवार यांच्या फिर्यादीनुसार देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

आरोपीची प्रकृती स्थिर 
अविनाश खंडागळेला पिंपरीतील वायसीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. बंदोबस्तावर रक्षक नेमल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक अरुण मोरे म्हणाले, अविनाश खंडागळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याला तळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील द्रुतगती मार्गावरील दरोडाप्रकरणी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावल्याने देहूरोड ठाण्यातील कोठडीत तो होता. त्याच्यावर जबरी चोरी, बलात्कार यासारखे अन्य गुन्हे दाखल आहेत. 

अंमलदाराची टाळाटाळ 
अविनाश खंडागळेने सकाळी सात वाजता आत्महत्येचा प्रयत्न केला. सरकारी सोपस्कारानंतर दुपारी 3:57 वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर ठाण्यातील दूरध्वनीवर माहितीसाठी वारंवार संपर्क साधूनही माहिती देण्यात आली नाही. ठीक आहे, पीआय साहेबांकडून माहिती घेतो म्हटल्यावर दूरध्वनीवरील कर्मचाऱ्याने हो घ्या, असे उद्धट उत्तर दिले. याबाबत मोरे यांना सांगितल्यानंतर त्यांनी सदर गुन्ह्याची स्वतःच माहिती दिली. 

Web Title: pimpri news dehuroad police station criminal