भटक्‍या कुत्र्यांमुळे नागरिकांत भीती

रवींद्र जगधने
मंगळवार, 20 मार्च 2018

पिंपरी - शहरात भटक्‍या कुत्र्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत कमी झाली आहे. मात्र, एप्रिल ते जानेवारीअखेरपर्यंत नऊ हजार ५६८ श्‍वानदंशांच्या घटनांची नोंद प्रशासनाकडे झाली आहे. कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. 

कुत्र्यांची संख्या वाढीची कारणे
 भटकी कुत्रे पकडण्यास प्राणीमित्रांचा विरोध
 एक मादी सात-आठ पिलांना एकावेळी जन्म देते
  कुत्रे पकडणाऱ्या वाहनाचा वास येत 
असल्याने कुत्रे दडून बसतात किंवा लांब 
पळून जातात 

पिंपरी - शहरात भटक्‍या कुत्र्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत कमी झाली आहे. मात्र, एप्रिल ते जानेवारीअखेरपर्यंत नऊ हजार ५६८ श्‍वानदंशांच्या घटनांची नोंद प्रशासनाकडे झाली आहे. कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. 

कुत्र्यांची संख्या वाढीची कारणे
 भटकी कुत्रे पकडण्यास प्राणीमित्रांचा विरोध
 एक मादी सात-आठ पिलांना एकावेळी जन्म देते
  कुत्रे पकडणाऱ्या वाहनाचा वास येत 
असल्याने कुत्रे दडून बसतात किंवा लांब 
पळून जातात 

कुत्री पकडणाऱ्या शहरातील संस्था
 संस्था  प्रभाग क्षेत्र

 पीपल फॉर ॲनिमल   १ ते १०
 सोसायटी फॉर द प्रीवेन्शन ऑफ क्रुरिटी टू ॲनिमल्स  ११ ते २२
 ॲनिमल वेलफेयर असोसिएशन्स   २३ ते ३२

पकडण्याची प्रक्रिया 
 नागरिकांच्या तक्रारीनंतर कुत्रे पकडणे
 गळ्यात पट्टा नसलेले कुत्रे भटके समजून पकडणे
 कुत्र्याच्या कानाला खूण केलेली असल्यास निर्बीजीकरण झालेली
 गळ्यात पट्टा असलेली पाळीव व निर्बीजीकरण झालेले कुत्रे पकडत नाहीत
 भटक्‍या कुत्र्यांना पकडून ते ठिकाण व वर्णन नोंद केले जाते
 वर्णन नोंदल्यानंतर कुत्र्यांना नेहरूनगर पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले जाते
 दवाखान्यात निर्बीजीकरण करून रेबीज लस दिली जाते
 निर्बीजीकरणानंतर चौथ्या दिवशी पकडलेल्या ठिकाणी 
कुत्रे पुन्हा सोडले जातात. 

कायदा काय सांगतो?
 पिल्ले असलेली मादी व पिल्लांना सहा महिने पकडता येत नाही
 निर्बीजीकरण शस्त्रक्रिया व उपचारांव्यतिरिक्त पकडता येत नाही

श्‍वान परवान्याबाबत
 नवीन परवाना वर्षासाठी : ७५ रुपये
 प्रत्येक वर्षी नूतनीकरण : ६० रुपये
 रेबीज प्रतिबंधक लस : ९० रुपये
शहरातील पशुवैद्यकीय दवाखाने
 कामगार भवन इमारत, गांधीनगर, पिंपरी
 स्वीमिंग पूल इमारत, आकुर्डी-प्राधिकरण

दृष्टिक्षेपात 
 रेबीज प्रतिबंधक लसीकरणानंतर श्‍वान पाळण्याचा 
परवाना मिळतो
 प्रत्येक वर्षाला लस बंधनकारक  रेबीज लस महापालिका रुग्णालयात मोफत, पाच डोस घेणे गरजेचे  श्‍वानदंशानंतर लस दिली जाते  खासगी रुग्णालयात पाच डोसची किंमत साधारणपणे पाच हजार   रेबीज झाल्यास उपचार नसल्याने मृत्यू होऊ शकतो  कुत्रे पकडणारे कर्मचारी व डॉक्‍टरांना रेबीज प्रतिबंधक लस दिलेली असते  कुत्रे पडकणाऱ्या संस्थांना महापालिका एका कुत्र्यासाठी ६९३ रुपये देते.

आणखी दोन संस्थांना कुत्रे पकडण्याचे काम देण्याची प्रक्रिया सुरू आहे. पकडलेले कुत्रे तीन दिवस ठेवण्यासाठी शेड बांधले जात आहेत. रेबीज प्रतिबंधक लस मुबलक आहेत. भटक्‍या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
- डॉ. अनिल रॉय, आरोग्य वैद्यकीय अधिकारी 

प्राण्यांबाबतची कायदे व नियमानुसार श्‍वान पकडून त्यांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करून रेबीज प्रतिबंधक लस दिली जाते. त्यानंतर त्यांना पकडलेल्या भागात सोडले जाते. विनाकारण कुत्र्यांना पकडले जात नाही. 
-डॉ. एच. एम. पाटील, पशुधन विकास अधिकारी

Web Title: pimpri news dog public