शहरातील नाल्यांना अतिक्रमणाचा विळखा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

पिंपरी - शहरात नाले बुजवून तसेच नाल्यांची दिशा बदलून ठिकठिकाणी बांधकामे होत आहेत. मात्र, या बांधकामांकडे महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. एवढेच नाही तर काही ठिकाणी महापालिकेनेच नाल्यांवर बांधकाम केल्याचे "सकाळ'ने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्‍यता आहे. 

शहरातील पावसाचे पाणी नाल्यांमधून नदीला जाऊन मिळते. मात्र, पवना नदीपात्रालगत भर टाकण्याचा प्रकार "सकाळ'ने उघडकीस आणला आहे. ठिकठिकाणी नाल्यांवर होणाऱ्या बांधकामाचा असाच धक्‍कादायक प्रकारही "सकाळ'ने उघडकीस आणला आहे. 

पावसाळ्यात नाल्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. इतरवेळी नाल्यांमध्ये पाण्याचे प्रमाण कमी असते. याचीच संधी साधत शहरातील काही महाभागांनी नाल्यांमध्ये भर घालून त्यावर बांधकामे केली आहेत. यामुळे नाले अरुंद झाले आहेत. 

महापालिकाही बांधकामात अग्रेसर 
शहरातील जागेची कमतरता लक्षात घेता नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेची जागाच शिल्लक नाही. यामुळे महापालिकेनेही नाल्यावर स्वच्छतागृहे व मंडईची उभारणी केली आहे. यामुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह थांबणार नसल्याचा महापालिकेचा दावा असला, तरी हे कितपत योग्य आहे, असा सवाल नागरिक विचारत आहेत. प्राधिकरण आणि एमआयडीसी परिसरातही नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याचे दिसून येत आहे. 

...तर काय होईल? 
अनेक भागात नाल्यांमध्ये भर घालून बांधकाम केले आहे. पावसाचे पाणी नाल्यांमध्ये आल्यावर अरुंद ठिकाणी पाण्याचा निचरा न होता फुगवटा निर्माण होईल. हेच पाणी मग वस्त्यांमध्ये शिरून नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. पाण्याचा प्रवाह जादा असल्यास भर घातलेल्या ठिकाणची बांधकाम पडून जीवितहानी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

कारवाई केली जाईल - आयुक्‍त 
शहरात कोणत्या ठिकाणी नाल्यांमध्ये भराव टाकून अतिक्रमणे उभारली आहेत. याबाबतची माहिती मिळाल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल. नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा होईल, असे काम कोणी करू नये. नागरिकांनाही याबाबत माहिती असल्यास त्यांनी सारथीवर याबाबत माहिती द्यावी, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

Web Title: pimpri news encroachment