‘नो हॉकर्स झोन’ला केराची टोपली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

पिंपरी - काळेवाडी फाटा ते देहू- आळंदी रस्ता या ४५ मीटर रुंद बीआरटी मार्गावरील काळेवाडी फाटा ते एमएम महाविद्यालय दरम्यान पुणे वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त अशोक मोराळे यांनी नो हॉल्टिंग व नो हॉकर्स झोनचा आदेश दिला. त्याला केराची टोपली दाखवत एक महिना उलटूनही अंमलबजावणी केली नाही. 

वाहने व हातगाड्यांच्या विळख्यामुळे प्रशस्त रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होतो. या समस्येबाबत नागरिकांनी वाहतूक विभागाकडे तक्रार केली. पाहणीत हातगाडी व पथारीवाले तसेच ट्रॅव्हल बससह इतर वाहने थांबत असल्याने कोंडी होते. अहवालानुसार हा मार्ग नो हॉल्टिंग व नो हॉकर्स झोनचा आदेश मोराळे यांनी दिला. त्यामुळे कोंडी कमी होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, पोलिस व महापालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे या आदेशाची अंमलबजावणी झालीच नाही. 

आदेश मिळाला नाही
वाहतूक विभागाने सदर आदेश दिल्यानंतर एक प्रत महापालिकेला सूचना फलकासाठी पाठविल्याचे वाहतूक पोलिस निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी सांगितले, तर सदर आदेशाची प्रत मिळाली नसल्याचे बीआरटी विभागाचे प्रवक्ते विजय भोजने यांचे म्हणणे आहे.  

दोन दिवसांपूर्वी रहाटणी फाटा येथे एक रुग्णवाहिका अडकली होती. पोलिसांनी या ठिकाणी थांबणाऱ्या बेकायदा ट्रॅव्हलवर कारवाई करावी.
- राज तापकीर, अध्यक्ष, भाजप युवा मोर्चा

महापालिकेने सूचना फलक लावावा. त्यानंतर कारवाई करता येईल. 
- किशोर म्हसवडे, पोलिस निरीक्षक, सांगवी वाहतूक विभाग    

वाहतूक विभागाने नो हॉल्टिंग व नो हॉकर्स झोनबाबतच्या आदेशाची प्रत आणून दिल्यास तत्काळ फलक लावले जातील.
- अंबादास चव्हाण,  शहर अभियंता, स्थापत्य विभाग

Web Title: pimpri news encroachment No Hawkers Zone