उत्तर भारताकडे धावणाऱ्या रेल्वेगाड्या वाढवा - बारणे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

पिंपरी - उत्तर भारतात जाण्यासाठी रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली. त्या वेळी उत्तर भारतीय रेल्वे प्रवासी संघटनेचे गुलाब तिवारी, रामचंद्र ठाकूर, राजेंद्र पांडे, सुभाष सिंग उपस्थित होते. 

पिंपरी-चिंचवड, पुण्यात उत्तर भारतातील अनेक जण नोकरी, व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्ताने स्थायिक झाले आहेत. सध्या पुण्यातून उत्तर भारतात थोड्याच रेल्वेगाड्या धावतात. त्यामुळे फेऱ्या वाढविण्याची मागणीने जोर धरला आहे. 

सध्या पुण्यातून सुटणारी ज्ञानगंगा एक्‍स्प्रेस, पुणे गोरखपूर एक्‍स्प्रेस आठवड्यातून एकदाच सोडण्यात येतात. त्यामुळे उत्तर भारतात जाणाऱ्यांची गैरसोय होते. या गाड्या दररोज सोडल्यास प्रवाशांना फायदा होणार आहे. पुण्याहून अयोध्येला जाण्यासाठी थेट रेल्वेगाडी नाही. रेल्वे मंत्रालयाने या मार्गावरही गाडी सोडावी, अशी मागणी बारणे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.

Web Title: pimpri news Extend trains running north India Shrirang Barne