होय, मला जगायचंय कुटुंबीयांसाठी 

संदीप घिसे
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

पिंपरी -नाव रोझमेरी जोसेफ, काम नोकरी, पगार दहा हजार रुपये, अवलंबित व्यक्‍ती चार... सर्वसामान्य कुटुंबातील ही महिला गर्भाशयाच्या आजाराने त्रस्त आहे. डॉक्‍टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिलाय. पण तुटपुंज्या पगारात जगायचं कस आणि शस्त्रक्रियेचे पैसे द्यायचे कसे, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर असून, त्यांना कुटुंबासाठी जगायचे आहे. 

पिंपरी -नाव रोझमेरी जोसेफ, काम नोकरी, पगार दहा हजार रुपये, अवलंबित व्यक्‍ती चार... सर्वसामान्य कुटुंबातील ही महिला गर्भाशयाच्या आजाराने त्रस्त आहे. डॉक्‍टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिलाय. पण तुटपुंज्या पगारात जगायचं कस आणि शस्त्रक्रियेचे पैसे द्यायचे कसे, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर असून, त्यांना कुटुंबासाठी जगायचे आहे. 

पिंपळे सौदागरमध्ये राहणाऱ्या रोझमेरी यांना दोन वर्षांपूर्वी गर्भाशयाचा गंभीर आजार झाल्याने डॉक्‍टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. चष्म्याच्या दुकानात काम करून त्यांना दरमहा दहा हजार रुपये पगार मिळतो. त्यापैकी सहा हजार घरभाडे, तर चार हजार रुपये घरखर्चाला जातात. त्यामुळे शिल्लक राहण्याचा प्रश्‍नच येत नाही. मुलगी जॉइस ही रॉजर्स स्कूलमध्ये सहावीत शिकते. तिच्या शाळेची आठ हजार रुपये फी आणि पुस्तकांचे साडेतीन हजार रुपये न भरल्यामुळे काही दिवसांपूर्वी शाळेत तिला शाळेत येण्यास मनाई केली. रोझमेरी यांनी विनंती केल्यावर फी भरण्यासाठी शाळेकडून मुदत देण्यात आली आहे. मात्र हे पैसे भरायचे कोठून असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. तसेच पैसे नसल्याने त्या मुलीला पाऊण तास चालत जाऊन शाळेत सोडतात.

काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे हृदयविकाराने निधन झाले. आठवीपर्यंत शिक्षण झालेल्या रोझमेरी यांच्यावर त्यांच्या मुलीची जबाबदारी आली. सासरकडूनही काहीच मदत न मिळाली नाही. त्यांच्या एकमेव भावाचाही फीट येऊन मृत्यू झाला. त्यामुळे वृद्ध आई-वडिलांचीही जबाबदारी त्यांच्यावर आली. सध्या त्या आई-वडील व मुलीचा सांभाळ करतात. तब्ब्येतीकडे दुर्लक्ष केले व आपल्याला काही झाले तर या तिघांचा सांभाळ कोण करणार, असा प्रश्‍न त्यांना सतावत आहे. 

दुर्दैवाचा फेरा सुरूच
रोझमेरी यांचा दुर्दैवाचा फेरा येथेच थांबला नाही. काही दिवसांपूर्वी त्यांना मधुमेह झाल्याने त्यांची दृष्टी कमी होत आहे. त्यामुळे त्यांना पूर्वीप्रमाणे काम करता येत नाही. तसेच एका कानानेही ऐकू येत नाही. शस्त्रक्रिया न केल्यास कॅन्सरही होऊ शकतो, असा इशारा डॉक्‍टरांनी दिला आहे. शस्त्रक्रियेसाठी पैसे लागणार आणि शस्त्रक्रियेनंतर किमान १५ दिवस घरी राहावे लागेल. घरी राहिले तर पगार कोण देणार, घरभाडे आणि घरखर्च कोठून कसा चालणार हा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. यामुळे त्या शस्त्रक्रिया करण्याचे टाळत आहे. मात्र शस्त्रक्रिया होणे गरजेचे असल्याने त्यांना आर्थिक मदतीचीही गरज आहे.

Web Title: pimpri news family