मावळातील पाचशे मुलींची थांबली पायपीट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

सोमाटणे -  गेल्या अनेक वर्षांपासून मावळाच्या दुर्गम भागातील गाव, वाडी, वस्त्यांवर राहणाऱ्या सावित्रीच्या लेकींना शिक्षणासाठी घरापासून अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. शाळेपर्यंत प्रवास करण्यासाठी वेळेवर कोणतेच साधन नसल्याने अनेक पालक मुलींना शिक्षणासाठी दूरच्या शाळांत पाठवत नव्हते. परिणामी शिकण्याची इच्छा असूनही दुर्गम भागातील अनेक मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. ही परिस्थिती पाहून सर्व मुलींना शिक्षण मिळावे, त्यांची शिक्षणासाठीची पायपीट कायमची थांबावी, या उद्देशाने स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानचे संस्थापक उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी पुढाकार घेतला.

सोमाटणे -  गेल्या अनेक वर्षांपासून मावळाच्या दुर्गम भागातील गाव, वाडी, वस्त्यांवर राहणाऱ्या सावित्रीच्या लेकींना शिक्षणासाठी घरापासून अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. शाळेपर्यंत प्रवास करण्यासाठी वेळेवर कोणतेच साधन नसल्याने अनेक पालक मुलींना शिक्षणासाठी दूरच्या शाळांत पाठवत नव्हते. परिणामी शिकण्याची इच्छा असूनही दुर्गम भागातील अनेक मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. ही परिस्थिती पाहून सर्व मुलींना शिक्षण मिळावे, त्यांची शिक्षणासाठीची पायपीट कायमची थांबावी, या उद्देशाने स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानचे संस्थापक उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नातून गेल्या सहा महिन्यांत पवनमावळ, आंदरमावळ, नानेमावळातील पाचशे मुलींना सायकली देण्यात आल्या.

पवनमावळातील चांदखेड येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत शिक्षण घेणाऱ्या पाचाणे, पुसाणे, कुसगाव, आढले, कासारसाई येथील मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले. पुढील महिन्यात उर्वरित दोनशे मुलींना सायकली वाटण्यात येणार आहेत. मुलींना सायकली मिळाल्याने त्यांची शिक्षणासाठीची पायपीट थांबली आहे. या अनोख्या मदतीमुळे आमची पायपीट थांबली असून, आम्ही याचा उपयोग अभ्यास करण्यासाठी करू. त्यातून गुण वाढवण्यासाठी प्रयत्न करू, अशा भावना मुलींनी व्यक्त केल्या. या कार्यक्रमास सुनील गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या अलका धानीवले, पंचायत समिती सदस्या निकिता घोटकुले, अजित आगळे, विठ्ठल घारे, छगन कडू, उमेश बोडके, अमोल कांबळे, पौरस बारमुख, संतोष बांदल, बाळासाहेब केदारी, संदीप येवले, मनोज येवले, हिरामण केदारी, सचिन घारे,  जितू शहा, संतोष आगळे, अविनाश गराडे 
उपस्थित होते.

Web Title: pimpri news Five hundred girls were given bicycles