फ्लेक्‍झिबल बॅरिअर उपक्रम कुचकामी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

सोमाटणे - बेशिस्त वाहनचालकांमुळे द्रुतगती मार्गावरील फ्लेक्‍झिबल हाइट बॅरिअर कुचकामी ठरत असून, अवजड वाहनांमुळे अनेक हाइट बॅरिअर तुटल्या आहेत. 

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर अवजड वाहनचालकांनी लेनची शिस्त पाळावी, यासाठी उपाय म्हणून चार दिवसांपूर्वी रस्तेविकास महामंडळाने प्रायोगिक तत्त्वावर खालापूर ते खंडाळा एक्‍झिटदरम्यान फ्लेक्‍झिबल हाइट बॅरिअर बसविल्या. या बॅरिअरखालून फक्त हलकी वाहने जाऊ शकतात. या उपक्रमाचे औपचारिक उद्‌घाटन पोलिस महासंचालक ए. के. पद्मनाभन यांच्या हस्ते करण्यात आले.

या उपायांमुळे द्रुतगती मार्गावरून जाणारे अवजड वाहनचालक लेनची शिस्त पाळतील, ही अपेक्षा महामार्ग पोलिसांना होती. परंतु, बेशिस्त वाहनचालकांनी चार दिवसांतच आपले गुण दाखविण्यास सुरवात केली. सुसाट निघालेल्या अवजड वाहनचालकांनी फ्लेक्‍झिबल हाइट बॅरिअरला गाड्या धडकून यात आठ हाइट बॅरिअर तोडले. उर्वरित किती दिवस टिकतील ही शंकाच आहे. त्यांची सातत्याने दुरुस्ती करावी लागणार आहे. वाहनचालकांच्या या बेशिस्तपणामुळे चांगली असणारी ही योजना कुचकामी ठरत आहे. लेनची शिस्त मोडणाऱ्या वाहनचालकांवर परिवहन विभागामार्फत कठोर दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे.

Web Title: pimpri news Flexible barrier