बसमध्ये पाकिटे चोरणारी टोळी जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

पिंपरी - बसमध्ये चढताना किंवा धावत्या बसमध्ये प्रवाशांच्या गर्दीत पाकिटे चोरणाऱ्या चौघांना सांगवी पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. 

पिंपरी - बसमध्ये चढताना किंवा धावत्या बसमध्ये प्रवाशांच्या गर्दीत पाकिटे चोरणाऱ्या चौघांना सांगवी पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. 

अनिल दीपक जाधव (वय 36), सचिन दत्तात्रय जाधव (वय 39), चंद्रकांत राजू जाधव (वय 23) दिलीप देविदास गायकवाड (वय 29, सर्व रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे), अशी आरोपींची नावे आहेत. सांगवी ठाण्याचे निरीक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये पाकिटांची चोरी करणारी टोळी सांगवी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावून आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी पाच गुन्ह्यांची कबुली दिली. सांगवी आणि वाकड ठाण्यातील दोन आणि चतुःशृंगी पोलिस ठाण्यातील एक असे पाच गुन्हे उघड झाले आहेत. या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. पकडलेले चोरटे व्यसन आणि मौज-मस्तीसाठी गुन्हे करत होते. आरोपींना न्यायालयाने दोन एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे, परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलिस आयुक्त विक्रम पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय चांदखेडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली. 

Web Title: pimpri news gang robbery in bus