साडेआठ हजार घरे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

प्राधिकरणाचा 561 कोटींचा अर्थसंकल्प; 
शहरात आठ ठिकाणी गृहयोजना राबविणार; 
केवळ घरांसाठी 213 कोटींची तरतूद 

आकडेवारी 
546 कोटींचा खर्च 
15 कोटींची शिलकीची रक्कम 
घरांसाठी 213 कोटी 
8,570 घरे 

पिंपरी - नवनगर विकास प्राधिकरणाचा 561 कोटी 3 लाख रुपये रकमेचा 2018-19 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी प्राधिकरण सभेला सादर केला. चर्चेअंती हा अर्थसंकल्प मंजूर केला. शहरात एकूण आठ ठिकाणी प्राधिकरणातर्फे गृहयोजना साकारण्यात येणार आहे. त्यामध्ये 8 हजार 570 घरे उभारण्याचे नियोजन आहे. संबंधित गृहयोजनांसाठी वर्षभराच्या कालावधीसाठी 213 कोटी रुपयांची तरतूद ठेवली आहे. 

विभागीय आयुक्त तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. प्राधिकरणाकडून 2018-19 या आर्थिक वर्षात 545 कोटी 99 लाख रुपये इतका खर्च अपेक्षित असल्याचे अर्थसंकल्पात नमूद आहे. त्यानुसार 15 कोटी 4 लाख रुपये इतक्‍या शिलकी रकमेचा हा अर्थसंकल्प आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, प्राधिकरणाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी भगवान घाडगे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, नगररचना विभागाचे उपसंचालक प्रकाश ठाकूर या वेळी उपस्थित होते. 

अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये : 
* अल्प उत्पन्न गट, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, मध्यम उत्पन्न गट (मध्यमवर्गीय), उच्च उत्पन्न गट (श्रीमंत) यासाठी घरांचे नियोजन 
* मोशी, भोसरी, भोसरी औद्योगिक वसाहत, वाल्हेकरवाडी, रावेत आदी परिसरात 8 ठिकाणी गृहयोजना 
* पेठ क्रमांक 12 मधील गृहयोजनेसाठी सर्वाधिक 78 कोटी 50 लाखांची तरतूद 
* वाल्हेकरवाडीतील गृहयोजनेसाठी 55, तर पेठ क्रमांक 6 मधील गृहयोजनेसाठी 25 कोटी 
* प्रस्तावित पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्रात (मोशी) खुल्या प्रदर्शन केंद्राचे नियोजन (तरतूद : 44.35 कोटी) 
* त्रिवेणीनगर येथील उर्वरित स्पाइन रस्त्याचे काम (महापालिका हद्द) : 6 कोटी 
* चिंचवड जुना जकात नाका ते रावेत रस्ता; महापालिकेकडे करणार तरतूद वर्ग : 15 कोटी 
* पेठ क्रमांक 9, 11, 13, 14, 16 मधील रस्ते व अन्य कामे : 10 कोटी 
* विविध विद्युतविषयक कामे : 14 कोटी 

अर्थसंकल्पातील विकासकामे 
* विविध पेठांमध्ये महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह - 1 कोटी 
* पेठ क्रमांक तीनमध्ये उद्यान - 2.60 कोटी 
* मोशी परिसरात विरंगुळा केंद्र - 3 कोटी 
* वाकड येथे पाण्याची उंच टाकी (महापालिकेकडे वर्ग) - 1.65 कोटी 
* ई-गव्हर्नन्स : 2.75 कोटी 
* भोसरी मध्यवर्ती सुविधा केंद्र आणि 
भोसरी औद्योगिक वसाहतीत (पेठ क्रमांक 7) व्यापारी संकुल : 9 कोटी 
* पेठ क्रमांक 24 मधील व्यापारी केंद्राचा विकास : 5 कोटी 
* भोसरी औद्योगिक वसाहतीत (पेठ क्रमांक 7 व 10) सुविधा केंद्र : 5 कोटी 

प्राधिकरणाकडून उभारली जाणारी घरे : 
परिसर घरांची संख्या उत्पन्न गट 
1) मोशी (पेठ क्रमांक 4) 105 आर्थिकदृष्ट्या दुर्बल 
2) मोशी (पेठ क्रमांक 6) 401 आर्थिकदृष्ट्या दुर्बल/मध्यम उत्पन्न/उच्च उत्पन्न 
3) भोसरी (पेठ क्रमांक 1) 727 आर्थिकदृष्ट्या दुर्बल/अल्प उत्पन्न/उच्च उत्पन्न 
4) भोसरी (पेठ क्रमांक 12) 4901 अल्प उत्पन्न/मध्यम उत्पन्न 
5) भोसरी औद्योगिक वसाहत 
(पेठ क्रमांक 7) 400 आर्थिकदृष्ट्या दुर्बल 
6) भोसरी औद्योगिक वसाहत 366 आर्थिकदृष्ट्या दुर्बल/अल्प उत्पन्न 
(पेठ क्रमांक 10) 
7) वाल्हेकरवाडी 
(पेठ क्रमांक 32-अ) 1400 अल्प उत्पन्न/मध्यम उत्पन्न 
8) रावेत (पेठ क्रमांक 29) 270 अल्प उत्पन्न/मध्यम उत्पन्न 

प्राधिकरणाकडून सध्या वाल्हेकरवाडी येथील गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. या कामाला विलंब झाल्याने संबंधित कंत्राटदाराला प्रतिदिन दहा हजार रुपये दंड लावला. पर्यायाने, आता या कामाला वेग आला आहे. भोसरी (पेठ क्रमांक 12) येथील गृहप्रकल्पासाठी पुढील महिनाभरात निविदा प्रक्रिया सुरू होईल. प्राधिकरणाकडून पुढील अडीच वर्षांत साडेआठ हजार घरे उभारण्याचे नियोजन आहे. 
- सतीशकुमार खडके, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राधिकरण 

Web Title: pimpri news home