शहरात अनधिकृत जाहिरात फलकांचे पेव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

शहरातील विविध भागांमध्ये लावलेल्या अनधिकृत जाहिरात फलकांबाबत शहानिशा करून कारवाई केली जाईल. नागरिकांनी परवानगी घेऊनच जाहिरात फलक लावावेत. महापालिकेने कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत.
- विजय खोराटे, सहायक आयुक्त

पिंपरी - शहरातील विविध भागांमध्ये अनधिकृत जाहिरात फलकांचे पेव फुटले असून, जागा मिळेल तिथे हे फलक लावण्याचे प्रमाण वाढले आहे.

महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागातर्फे गेल्या महिनाभरात ३० मोठी होर्डिंग्ज हटविली; तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून कारवाई करण्यात आली.

शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, दापोडी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव आदी भागांमध्ये अनधिकृत जाहिरात फलक पाहण्यास मिळतात. प्रत्येक विद्युत खांबावर एका जाहिरात फलकाला परवानगी असताना दोन फलक लावलेले दिसतात; तसेच झाडे, खासगी इमारतींवरही ते दिसतात. पीएमपीच्या बसथांब्यांवर जाहिरात पत्रके चिटकविल्याचे चित्र पाहण्यास मिळते.

कारवाईची सद्य:स्थिती
    अधिकृत होर्डिंग्ज (खासगी आणि महापालिका जागेवरील) : १९००
    आकाशचिन्ह परवाना विभागामार्फत अनधिकृत फलकांवर कारवाई (जुलै-२०१७ पासून २२ मार्च २०१८ पर्यंत) : १४०
    क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील कारवाई : जानेवारी व फेब्रुवारी २०१८ : एकूण २२२७

Web Title: pimpri news illegal advertise board