उड्डाण पुलाचे काम प्रगतिपथावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

नागरिकांच्या सोयीसाठी प्राधिकरणाने वेगाने काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. एकमेकास समांतर पुलांपैकी रावेत-औंध पुलाचे काम जुलैपर्यंत पूर्ण होईल. औंध-रावेत पुलाच्या कामात अडथला ठरणारे टॉवर लाइन हटविण्याचे काम महापालिकेकडे अाहे. त्यांच्या कार्यवाहीवर पुलाच्या कामाचा अवधी अवलंबून राहील. 
- संदीप खलाटे, कार्यकारी अभियंता, प्राधिकरण

पिंपरी - जगताप डेअरी ते साई चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने हाती घेतलेल्या उड्डाण पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. 

जुलैपर्यंत पुलाची एक बाजू पूर्ण करून ती वाहतुकीसाठी खुली करण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यात खुल्या होणाऱ्या रावेत-औंध (आरएचएस) या पुलामुळे साई चौकीवरील ताण कमी होणार असून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल.

पुणे-रावेत, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव परिसराला पुणे-बंगळूर या राष्ट्रीय महामार्गाशी व हिंजवडी आयटी क्षेत्राला जोडणाऱ्या साई चौकावर वाहतुकीचा मोठा ताण येत होता. त्यातच लष्कराने रक्षक रस्ता बंद केल्याने पिंपळे गुरवकडील वाहतूक साई चौकाकडे वळली होती. त्यामुळे वाहनांची अधिक भर पडल्याने येथील वाहतूक समस्या गंभीर झाली होती. गर्दीच्या वेळी चौकामध्ये चारही दिशेला दीड ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र नित्याचे झाले होते. चौकातील काही भाग प्राधिकरण, तर काही भाग महापालिका हद्दीत असल्याने दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन उपाययोजना करावी, अशी मागणी सातत्याने होत होती.

 

Web Title: pimpri news jagtap dairy to sai chowk over bridge work