भुयारी पादचारी मार्गाची काळेवाडीत दुरवस्था

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

पिंपरी - काळेवाडी येथील एमएम स्कूलसमोरील महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी भुयारी पादचारी मार्गाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असणाऱ्या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. पालिकेने त्वरित योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत. 

काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता बीआरटी मार्ग ओलांडण्यासाठी नागरिकांच्या मागणीनुसार येथे तयार केलेल्या पादचारी भुयारी मार्गाचे उद्‌घाटन (ता. २१ डिसेंबर २०१६) ला झाले. मात्र त्यानंतर मार्गाच्या स्वच्छतेकडे पालिकेने दुर्लक्ष केले. येथे नेहमी कचरा टाकला जातो.

तसेच या ठिकाणी गटारही तुंबले आहे. अनेक जण तंबाखू, गुटखा खाऊन थुंकत असल्याने मार्गात दुर्गंधी पसरली आले, तसेच रात्री तळीराम या परिसरात दारू पितात. त्यांचाही नागरिकांना त्रास आहे. 

रोडरोमिओंचा हैदोस
शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी या मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. मात्र मार्गाच्या दोन्ही प्रवेशद्वारावर व आत रोडरोमिओंचा वावर असतो. अनेकदा येथे छेडछाडीचे प्रकार देखील घडले आहेत.  

मार्गात अंधार 
मार्गातील अनेक दिव्यांची तोडफोड करण्यात आली असल्याने ते बंद आहेत. त्यामुळे दिवसाही येथे अंधार पसरलेला असतो. 

काम निकृष्ट दर्जाचे 
भुयारी मार्गाला सुमारे पावणेदोन कोटी खर्च आला आहे. मात्र आतून छताला चिरा पडल्या असून, त्यावाटे पाण्याची गळती होत आहे. तर आतील दिवे तुटले आहेत. तसेच लोखंडी पाइपही गायब आहेत. 

येथे सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही बसवण्याच्या मागणीचे निवेदन अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे व सुरक्षा विभागाचे जरांडे यांना देऊन तीन महिने झाले, मात्र अद्याप त्याची दखल घेतली नाही. महिलांसाठी हा मार्ग धोकादायक झाला असून, काही विपरीत घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे का? 
- नीता पाडाळे, नगरसेविका.  

या परिसरात वीज नाही, घाणीमुळे दुर्गंधी पसरली असून, याबाबत प्रशासनाला सांगूनही दखल घेतली जात नाही.
विनोद नढे, नगरसेवक.  

Web Title: pimpri news kalewadi Suburban Pedestrian Trail