महिलांसाठी ‘रंग दे मेहंदी स्पर्धा’

महिलांसाठी ‘रंग दे मेहंदी स्पर्धा’

पिंपरी - श्रावण महिना आला, की वेध लागतात ते सणांचे. श्रावणाच्या सुरवातीलाच असलेली नागपंचमी, त्यानंतर रक्षाबंधन, नारळी पौर्णिमासारखे सण खास करून महिला वर्गाचा आनंद आणि उत्साह वाढविणारे असतात. हे सण साजरे करताना परंपरेचा भाग म्हणून हातावर आणि पायावर मेंदी काढली जाते. याच परंपरेला स्पर्धेचे स्वरूप देऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावणातील सणांचा आनंद मेंदीने वृद्धिंगत करण्यासाठी ‘सकाळ’ने महिला व युवतींसाठी ‘रंग दे मेंदी’ स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा विनाशुल्क आहे. 

स्पर्धकांना सोन्या-चांदीची व्हाउचर्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. मेंदीची रेखाटने पाठविण्याची अंतिम मुदत शुक्रवारी (ता. २१) संपत आहे. म्हणूनच लवकर या स्पर्धेत सहभागी व्हा आणि जिंका आकर्षक बक्षिसे. 

या स्पर्धेत स्पर्धकाने ए-फोर आकाराच्या कागदावर काळ्या शाईने मेंदीचे रेखाटन काढायचे आहे. रेखाटन स्वतःच्या कल्पनेतील असले पाहिजे. रेखाटन केलेली नक्षी हातावर काढून हाताची दोन छायाचित्रे पाठवायची आहेत. प्रत्येक रेखाटनाच्या मागे स्पर्धकाचे पूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक लिहावा व सोबत पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्रे पाठवावीत. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास रु. ७०००, द्वितीय क्रमांकास रु. ५०००, तृतीय क्रमांकास रु. ४००० व चतुर्थ क्रमांकास रु. ३००० किंमतीचे सोन्या- चांदीचे व्हाउचर बक्षीस मिळेल. याशिवाय प्रत्येकी १००० रुपयांची १६ उत्तेजनार्थ पारितोषिके आहेत. 

रेखाटन पाठवण्याची ठिकाणे 
सकाळ पिंपरी विभागीय कार्यालय 
अभय ॲड्‌स, चापेकर चौक, चिंचवड - २७३५००४३
दिनेश ॲड्‌स, निगडी - २७६५७५८२
आर्यन क्रिएटिव्ह, भोसरी : ९८६०१३४४३४
प्रचिती पब्लिसिटी, मोरवाडी - ९५०३०००७५५
संजय बोरा, आळंदी रोड, भोसरी - ९४२३०१९०९९
भेगडे ॲडव्हर्टायझिंग कॅंटोन्मेंट कॉम्प्लेक्‍स, देहूरोड : ९९२१३६२१५२
अमृता सिल्क अँड सारिज, समर्थनगर, नवी सांगवी.
रमेश जाधव, तळेगाव दाभाडे - ९०११५५६७९९
विजय सुराणा, वडगाव मावळ - ९८२२४४८८२५
अधिक माहितीसाठी संपर्क
मिलिंद - ९५४५९५४७३३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com