मेट्रो, बीआरटीसाठी करणार झाडांचे स्थलांतर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

पिंपरी - शहरातील जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर सुरू असलेल्या मेट्रो आणि बीआरटी या विकास कामांमुळे परिसरातील हिरवाई गायब होणार आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाने या रस्त्यावरील चार हजार 567 चौरस मीटरचे सुशोभीकरण आणि 367 झाडे अन्यत्र हलविण्यास मान्यता दिली आहे. याखेरीज या मार्गावरील 119 झाडांच्या फांद्या देखील तोडण्यास उद्यान विभागाने परवानगी दिलेली आहे. 

सध्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी ते कासारवाडी दरम्यान ग्रेडसेपरेटर मधील जागेत मेट्रोचे पिलर उभारण्याचे काम सुरू आहे. याखेरीज निगडी ते दापोडी ही बीआरटी बससेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे कासारवाडी जवळील बीआरटी मार्गालगत असणारी झाडे काढून ती अन्यत्र लावण्याचे काम जोरात सुरू आहे. पिंपरी ते कासारवाडी दरम्यान सुरू असणाऱ्या मेट्रोच्या कामामध्ये आतापर्यंत रस्त्याच्या मध्यभागी करण्यात आलेले सुशोभीकरण काढण्यात आले आहे. पिंपरी ते रेंजहिल्स हा मेट्रोचा पहिला टप्पा राहणार असल्यामुळे कासारवाडी ते दापोडी दरम्यान मेट्रोच्या कामाला सुरवात झाल्यानंतर रस्त्याच्या दुभाजकांमध्ये करण्यात आलेले सुशोभीकरण काढण्यात येणार असल्याचे उद्यान विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर असणारी 367 झाडे काढल्यानंतर त्याची लागवड प्राधिकरणातील जागेवर करण्यात येणार आहे. रस्त्याच्या मध्यभागी असणारे सुशोभीकरण मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा केले जाण्याची शक्‍यता या अधिकाऱ्याने बोलून दाखविली. 

दरम्यान, विकास कामामध्ये येणारी झाडे काढण्यासाठी संबंधित यंत्रणांनी महापालिकेकडे अर्ज केला होता. त्यानंतर त्यांना परवानगी देण्यात आल्याचे महापालिका उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: pimpri news metro brt tree pune mumbai raod