मेट्रोचे काम सुसाट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

पिंपरी - मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पुढील टप्प्यातील कामे सुरू करण्याच्या उद्देशाने खराळवाडी ते संत तुकारामनगर दरम्यान उभारलेल्या खांबांवर पिअर कॅप बसविण्यास गेल्या पंधरवड्यात प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे खांबांवर व्हायाडक्‍ट बसविण्याचे काम लवकर पूर्ण करता येणार असल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. पुण्यापेक्षाही पिंपरी- चिंचवडमध्ये रस्ता रुंद असल्यामुळे वाहतूक कोंडी तुलनेने कमी होते. त्यामुळे मेट्रो प्रकल्प उभारणीच्या कामाला वेग आला आहे.

काय आहे व्हायाडक्‍ट
खांबांवर पिअर कॅप बसविल्यानंतर त्यावर सेगमेंट बसवून स्पॅन पूर्ण केला जातो. अशा एकत्रित स्पॅनला व्हायाडक्‍ट म्हणतात. त्यावरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही मेट्रो धावणार आहेत.

नदीपात्रात १२ खांब
दापोडीत हॅरिस पुलाच्या मधून मेट्रोचे खांब उभारण्यात येतील. मेट्रोच्या दोन खांबांचे फाउंडेशन घेण्यासाठी नदीपात्रामध्ये काम सुरू आहे. पुलांच्या दरम्यान बारा खांब उभारण्यात येतील. त्यापैकी पाच खांब नदीपात्रात आहेत.

पाइलिंगचे काम पूर्ण 
फुगेवाडी येथील मेट्रो स्थानकाच्या खांबांच्या फाउंडेशनसाठी पाइलिंग करून पाया घेतला जात आहे. त्या ठिकाणी २४ पाईल पूर्ण झाले आहेत. मार्गावरील खांबांना खडकाचा भक्कम पाया मिळालेला नाही, अशा ४० ठिकाणी पाइलिंगचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

३६९ सेगमेंट तयार 
खराळवाडी येथील पादचारी पुलाजवळील खांबावर व्हायाडक्‍ट उभारले आहे. तेथील चार खांबांवर २९ सेगमेंट बसवून तीन स्पॅन पूर्ण केले आहेत. येथील पादचारी पुलाची उंची कमी असल्यामुळे तो तसाच ठेवण्यात येईल. येथे चीनवरून आणलेला सेगमेंट लाँचर बसविला आहे. त्याच्या साह्याने दोन खांबांवरील स्पॅन पूर्ण करण्यास केवळ दोन-तीन दिवस लागतात. सेगमेंटची निर्मितीही मोठ्या प्रमाणात केली आहे. ३६९ सेगमेंट तयार आहेत. त्यामुळे या भागातील खांबांवर पिअर कॅप बसविण्याला प्राधान्य दिले आहे.

स्थानकाचे काम प्रगतिपथावर
पुणे- मुंबई महामार्गावर वल्लभनगर एसटी बसस्थानकाजवळ मेट्रोचे पहिले स्थानक (संत तुकारामनगर) उभारण्यात येत आहे. त्याचा पादचारी पूल लवकर बनविण्यासाठी बसस्थानकाच्या आवारात आणि विरुद्ध बाजूस पदपथालगत मेट्रो स्थानकाच्या पादचारी पुलासाठी काम सुरू आहे. तेथील व्हायाडक्‍ट आणि पुलाचे काम झाल्यानंतर महापालिकेने उभारलेला पादचारी पूल काढून टाकण्यात येईल, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आज बैठक 
मोकाट कुत्र्यांचा उपद्रव थांबविण्यासाठी सोमवारी (ता. २६) माण ग्रामपंचायतीच्या कार्यालयात पशुवैद्यकीय व आरोग्य विभागाची तातडीची बैठक बोलावल्याचे मुळशीचे उपसभापती पांडुरंग ओझरकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘अशा घटना वारंवार घडू नये, यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी ही बैठक होणार आहे.’’

आकडे बोलतात
फाउंडेशन  - ९६
खांब  - ६०
पिअर कॅप  - ३२  
पाइलिंग  - ६४
स्पॅन  - ३
 
Web Title: pimpri news metro work speed