थेरगावात ‘यज्ञ’ आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

पिंपरी - सरकारला सद्‌बुद्धी देण्यासाठी, प्राधिकरणातील हक्काच्या घरांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी, घर बचाव संघर्ष समितीतर्फे गुरुवारी (ता. २४) थेरगावातील धनगरबाबा मंदिरासमोर प्रतीकात्मक यज्ञ आंदोलनाला सुरवात करण्यात आली. 

पिंपरी - सरकारला सद्‌बुद्धी देण्यासाठी, प्राधिकरणातील हक्काच्या घरांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी, घर बचाव संघर्ष समितीतर्फे गुरुवारी (ता. २४) थेरगावातील धनगरबाबा मंदिरासमोर प्रतीकात्मक यज्ञ आंदोलनाला सुरवात करण्यात आली. 

सकाळी साडेदहाला सुरू झालेल्या हा यज्ञ दुपारी दोनपर्यंत सुरू होता. हा यज्ञ सरकार प्राधिकरणातील घरे वाचवत नाहीत तोपर्यंत सुरूच राहणार आहे. महापालिका आणि प्राधिकरणाच्या मंजूर विकास आराखड्यानुसार ३० मीटर रुंद एचसीएमटीआरचा ६५ टक्के जागेचा ताबा असून, उर्वरित जागा ताब्यात घेण्याबाबत पालिका व प्राधिकरणामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. वाल्हेकरवाडी ते रहाटणीपर्यंतच्या प्राधिकरणाच्या नियोजन क्षेत्रातील एचसीएमटीआर रस्त्याच्या आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी हा यज्ञ सुरू केला असल्याचे घर बचाव समितीचे समन्वयक धनाजी येळकर-पाटील यांनी सांगितले. मनोहर पवार, मारुती भापकर, विशाल पवार, प्रशांत सपकाळ, बजरंग पवार, राजेंद्र देवकर, प्रदीप पवार, राजश्री शिरवळकर, बबिता ढगे, सुनीता फुले, हेमलता लांडे, तानाजी जवळकर, भालचंद्र फुगे आदींसह थेरगाव, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, रहाटणी, पिंपळे गुरव भागातील नागरिक उपस्थित होते. 

यज्ञ आंदोलन कायम केले जाणार असून, बाधित क्षेत्रातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन यज्ञ करून सरकारकडून न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सरकारला जाग न आल्यास सरकारची याच यज्ञात होळी करण्याचा संकल्प नागरिक करणार आहेत, असे मत येळकर यांनी व्यक्त केले. 

Web Title: pimpri news Movement