खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

पिंपरी - पिंपरी विभागातील विद्युत पुरवठा रोज सातत्याने खंडित होत 
असून, वीज वितरण कंपनीकडे अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी करूनही अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांत तीव्र असंतोष पसरला आहे. 

वीज नियामक आयोगाच्या नियमानुसार विद्युत पुरवठा खंडित झाल्यास दंडात्मक कारवाई करता येते; परंतु, आतापर्यंत कोणावरही कारवाई झालेली नाही. पिंपरी कॅम्प शाखा कार्यालयात फार मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे. 

तक्रार निवारण केंद्रात जो दूरध्वनी आहे. त्याचा रिसिव्हर काढून ठेवलेला असतो. त्यामुळे ग्राहकांना तक्रार करता येत नाही. कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व तक्रार दाखल करून घेणारे कर्मचारी जागेवर नसतात. टेलिफोन ऑपरेटर कधीही जागेवर नसतात. असलेच तर, उडवाउडवीची उत्तरे देतात, अशी तक्रार माजी नगरसेवक श्रीरंग शिंदे केली आहे. पिंपरीतील महावितरणचे कार्यकारी अभियंता सहा वर्षांपासून या ठिकाणी आहेत. त्यांच्याविषयी अनेक तक्रारी असल्याने त्यांची बदली करण्यात आली होती; मात्र, त्यांनी ती रद्द करवून घेतल्याचे बोलले जाते. कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणावर विजेची  चोरी होते, परंतु त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करतात, अशी तक्रारही शिंदे यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली असून, आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Web Title: pimpri news mseb