खुनाच्या कटात सहभागी  असणाऱ्या दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

पिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम यांच्या खुनाच्या कटात सहभागी झाल्याप्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यांसह दोघांना गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अटक केली. 

हमीद शेख आणि सचिन जाधव अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. हमीद हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका गीता मंचरकर यांचे पती ॲड. सुशील मंचरकर, सुरेश स्वामिनाथ झेंडे, राजू ऊर्फ काल्या महादेव पात्रे यांना यापूर्वीच अटक केली आहे. यासंदर्भात संजय काशिनाथ चंदनशीव (रा. दत्तनगर, आंबेगाव, पुणे) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

क्षेत्रीय सभेत झालेल्या हाणामारीच्या केसमध्ये ॲड. मंचरकर हे तुरुंगात असताना त्यांची आरोपींशी ओळख झाली. तिथेच कैलास कदम यांच्या खुनाचा कट रचला गेला. त्यासाठी आरोपींना तुरुंगाबाहेर काढून पळून लावण्याचेही ठरले. त्यानुसार १० एप्रिल रोजी आरोपी पळून गेले. आरोपी पळून गेल्यावरही ते ॲड. मंचरकर यांच्या संपर्कात होते. कैलास कदम यांचा खून करण्यासाठी मंचरकर यांनी पाच लाख रुपये दिल्याचे, तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी अधिक तपास केला असता पिंपरी खराळवाडी येथील माजी स्वीकृत सदस्य आणि सध्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला हमीद शेख आणि त्याचा साथीदार सचिन जाधव या दोघांचा सहभाग असल्याचे आढळून आले. त्यामुळे शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र तोडकर यांनी दिली.

Web Title: pimpri news murder case