मोर्चानंतर राष्ट्रवादीची स्वच्छता मोहीम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

पिंपरी - वाढत्या महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शनिवारी शहरात जन हाहाकार मोर्चा काढला. त्या वेळी नागरिकांनी टाकलेला कचरा, लावलेले बॅनर आणि झेंडे मोर्चानंतर लगेच काढून घेतले. 

वाढती महागाईच्या विरोधात राष्ट्रवादीने काळेवाडी ते पिंपरी चौक या दरम्यान जन हाहाकार मोर्चाच्या माध्यमातून जोरदार शक्‍तिप्रदर्शन केले. शनिवारी झालेल्या या मोर्चासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शहरात ठिकठिकाणी बॅनर आणि होर्डिंग्ज लावले होते. तसेच मोर्चाच्या मार्गावर राष्ट्रवादीचे झेंडेही लावले होते. अनेक ठिकाणी नागरिकांनी फटाके वाजवून या आंदोलनाचे स्वागत केले. यामुळे रस्त्यावर कचरा झाला होता. 

मात्र राष्ट्रवादीच्या नऊ कार्यकर्त्यांनी मोर्चानंतर रस्त्यावरील हा कचरा लगेच उचलून स्वच्छता केली. तसेच शहरात ठिकठिकाणी लावलेले फलक आणि झेंडेही काढून घेतल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिली.

Web Title: pimpri news NCP rally