पार्किंगचा प्रश्‍न बनला जटिल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावर निगडी ते दापोडी या अंतरातील वाहनांच्या पार्किंगचा प्रश्‍न जटिल बनत चालला आहे. महापालिका हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावर पार्किंगसाठी वाहनतळाची अपुरी सुविधा आहे. पर्यायाने, रस्त्यावरच वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने वाहने लावली जातात. काही वाहने तर चक्क पदपथावर लावली जातात. त्यामुळे पादचाऱ्यांचीदेखील गैरसोय होते. निगडी ते दापोडी या अंतरातील पार्किंग समस्येबाबत ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली. त्याचा हा सविस्तर वृत्तांत.  

समस्येचे नेमके स्वरूप  
 सेवा रस्त्यावर दोन्ही बाजूला पार्किंगसाठी आवश्‍यक व्यवस्थेचा अभाव
 महामार्गावर बऱ्याच ठिकाणी सेवा रस्त्याच्या बाजूला वाहनांसाठी ‘नो पार्किंग’
 नो पार्किंग’मध्ये वाहने लावण्याचे प्रमाण मोठे
 दापोडी, फुगेवाडी, निगडी, चिंचवड स्टेशन येथे काही ठिकाणी पदपथावरच वाहने लावली जातात. 
 निगडी, आकुर्डी, चिंचवड स्टेशन, पिंपरी, खराळवाडी, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी परिसरात रस्त्यावर, कंपन्या, खासगी हॉटेल यांच्यासमोर असलेल्या पदपथावरदेखील वाहने लावली जातात. 

वाहनतळाची सध्याची सोय 
 निगडी-टिळक चौकातील उड्डाणपुलाखाली 
 संत तुकाराम व्यापार संकुलाजवळ (निगडी)
 जिंजर हॉटेलजवळ (पिंपरी)
 पिंपरी उड्डाणपुलाशेजारील खासगी मॉलजवळ (पिंपरी)

प्रस्तावित वाहनतळ  
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागे 
 निगडी येथे भक्ती-शक्ती चौकात 
   टिळक चौकात
 फुगेवाडी जकातनाका येथे प्रस्तावित मेट्रो कार्यालयाशेजारी 

उपाययोजना  
 पालिका आणि वाहतूक विभागाने महामार्गाजवळ टप्पानिहाय वाहनतळ निश्‍चित करावे.
 ‘नो पार्किंग’, पदपथावरील वाहनांवर कारवाई 
 पार्किंगबाबत शिस्त लावण्यासाठी सम-विषम तारखेनुसार करावे नियोजन 
 रस्त्यावर वेड्यावाकड्या लावलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई

महामार्गावरील निगडी ते दापोडी या अंतरातील पार्किंगची समस्या लक्षात घेता सध्या काही ठिकाणी पार्किंगची सोय केलेली आहे. तर, काही वाहनतळ विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. हे वाहनतळ विकसित झाल्यानंतर पार्किंगची समस्या सुटण्यास मदत होईल.
- विजय भोजने, प्रवक्ते, बीआरटीएस विभाग, पालिका

निगडी ते दापोडी या अंतरात असलेल्या पदपथावरील अतिक्रमण हटवायला हवे. अतिक्रमण हटविल्यास पार्किंगची योग्य सोय होऊ शकेल. महामार्गावर ज्या ठिकाणी उड्डाण पूल आहेत तिथे पार्किंगची सोय होऊ शकेल.
- मुनीर शेख, वाहतूक व्यावसायिक.

Web Title: pimpri news parking issue