पवनाथडी जत्रेस रेकॉर्ड ब्रेक गर्दी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

नवी सांगवी - येथील पीडब्ल्यूडी मैदानावर महापालिकेच्या वतीने आयोजित पवनाथडी जत्रेस रविवारी (ता. 7) नागरिकांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली. सुटीमुळे सकाळपासूनच पिंपरी-चिंचवडसह उपनगर आणि पुण्यातून नागरिकांचे लोंढेच्या लोढे मैदानाकडे जात होते. मैदानाबाहेरील वाहनतळ पूर्णपणे भरून गेला. त्यामुळे संरक्षण विभागाच्या मैदानाबरोबर कृष्णा चौक, साई चौक ते माहेश्वरी चौकापर्यंत नागरिकांनी वाहने उभी केली होती. दरम्यान, जत्रेचा समारोप सोमवारी (ता. 8) सायंकाळी सात वाजता सुरेखा पुणेकर यांच्या लावणीच्या कार्यक्रमाने होईल. 

गुरुवारी पहिल्या दिवशी जत्रेस अल्प प्रतिसाद मिळाला. शुक्रवारीही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बहुतेकांचा उपवास होता. त्यामुळे खवैयेगिरीला चापच लागला. शनिवारी वीस लाखांच्यावर स्टॉलधारकांनी व्यवसाय केला. रविवारी उलाढाल तीस लाखांपेक्षा अधिक होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, बचत गटांऐवजी खासगी हॉटेल व्यावसायिक अधिक व्यवसाय करीत असल्याचे काही ठिकाणी पाहायला मिळाले. यावर नगरसेविका उषा मुंढे यांनी नाराजी व्यक्त केली. 

नगरसेविका मुंढे म्हणाल्या, की बचत गटांचे स्टॉलचे लकी ड्रॉद्वारे वाटप झाले. मात्र, काही हॉटेल व्यावसायिकांनीही आपले बस्तान बसविले होते. त्यामुळे ज्या स्टॉलवर पुरुष मंडळी दिसली त्यांना आम्ही बाहेर पडायला सांगितले. लहान मुलांच्या खेळण्यांचे दरही अवाजवी आहेत. महापालिकेचा पवनाथडी जत्रेचा उद्देश पैसे कमविणे नसून बचत गटांच्या उन्नतीचा आहे; परंतु याला सर्रास हरताळ फासला जात आहे. 

बचत गटांतून महिला सक्षमीकरण हा महापालिकेचा उद्देश आहे. त्यामुळे महिलांनी जत्रेत दर्जेदार उत्पादनांतून आर्थिक कमाई जरूर करावी; परंतु त्यांनी उद्देशापासून मागे जाता कामा नये. महापालिकेच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा. 
संभाजी येवले, समाजविकास अधिकारी 

Web Title: pimpri news Pavanathadi jatra