साडेनऊशे संस्थाकडून लेखापरीक्षण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

पिंपरी - सहकारी गृहरचना संस्थांमध्ये लेखापरीक्षणाविषयी जागृती आली असून, शहरातील ९५० संस्थांनी लेखापरीक्षणाचा अहवाल सहकार खात्याकडे सादर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा यामध्ये १५ टक्‍यांची वाढ झाली असल्याचे सहकार खात्याचे उपनिबंधक प्रतीक पोखरकर यांनी सांगितले. 

पिंपरी - सहकारी गृहरचना संस्थांमध्ये लेखापरीक्षणाविषयी जागृती आली असून, शहरातील ९५० संस्थांनी लेखापरीक्षणाचा अहवाल सहकार खात्याकडे सादर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा यामध्ये १५ टक्‍यांची वाढ झाली असल्याचे सहकार खात्याचे उपनिबंधक प्रतीक पोखरकर यांनी सांगितले. 

पिंपरी-चिंचवडमध्ये दोन हजार तीनशे सहकारी गृहरचना संस्था आहेत. ज्या संस्थांनी लेखापरीक्षणाचा अहवाल अद्याप सादर केला नाही.त्यांना नोटिसा पाठविात येणार आहे. सहकारी गृहरचना संस्थांमध्ये लेखापरीक्षणाविषयी चांगले प्रबोधन झाले आहे. त्यामुळे हा आकडा वाढू लागला आहे. गेल्या वर्षी केवळ सातशे संस्थांनी लेखापरीक्षणाचा अहवाल सादर केला होता. त्यानंतर सहकार विभागाने गृहरचना संस्थांनी लेखापरीक्षण केले नाही. त्यांना नोटिसा बजावल्या होत्या. नोटिसा पाठवूनही ज्यांनी प्रतिसाद दिला नव्हता. त्या संस्थांवर अवसायकाची नेमणूक करण्याची तयारी केली होती. शहरातील सहकारी गृहरचना संस्थांमध्ये लेखापरीक्षणाबाबत चांगली जागरूकता आली असल्यामुळे २०१६-१७ या आर्थिक वर्षांमध्ये लेखापरीक्षण सादर करणाऱ्या संस्थांच्या संख्येत वाढ झाल्याचे पोखरकर यांनी नमूद केले. 

दरम्यान, शहरातील एक हजार ३५० सहकारी गृहरचना संस्थांनी २०१६-१७ या आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल सादर केलेला नाही. त्यांना नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी सहकार विभागाकडून सहकारी गृहरचना संस्थांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये अनेक संस्थांचा ठावठिकाणा सापडला नव्हता. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना पाठवलेल्या नोटिसा देखील परत आल्या होत्या. सहकार विभागाने अशा ठिकाणी कर्मचारी पाठवून शहानिशा केली होती. सहकारी गृहरचना संस्थांवर सहकार खात्याने लेखापरीक्षकांची नियुक्‍ती केली होती. मात्र, त्यालाही काही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले नव्हते. त्यामुळे त्यांचा लेखापरीक्षणाचा अहवाल पूर्ण होऊ शकला नव्हता, असे पोखरकर यावेळी म्हणाले.

Web Title: pimpri news pcmc Co-operative Housing Society