महापालिका भवनात उभारणार सौरऊर्जा प्रकल्प

संदीप घिसे
मंगळवार, 18 जुलै 2017

पिंपरी - राज्यातील विजेचा तुटवडा लक्षात घेता सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन शासनाकडून केले जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने सौरऊर्जेचा वापर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिका भवनामध्ये सौरऊर्जेचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी खर्च होणारी रक्‍कम आगामी पाच वर्षांत वसूल होणार आहे.

पिंपरी - राज्यातील विजेचा तुटवडा लक्षात घेता सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन शासनाकडून केले जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने सौरऊर्जेचा वापर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिका भवनामध्ये सौरऊर्जेचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी खर्च होणारी रक्‍कम आगामी पाच वर्षांत वसूल होणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेत एसी, पंखे, लाइट, लिफ्ट, पाण्याचा कूलर, संगणक, झेरॉक्‍स मशिन यांसारख्या उपकरणाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. या उपकरणांकरिता ९९० किलोवॉट क्षमतेची आवश्‍यकता असते. महापालिका भवनातील वीज बिलापोटी दरवर्षी सुमारे एक कोटी रुपयांचा खर्च येतो. याशिवाय वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटरचा वापर केला जातो. वीजबचत कशी होईल व महापालिकेच्या पैशांची कशी बचत होईल, याकरिता विद्युत विभाग नेहमीच प्रयत्नशील असतो. याचाच एक भाग म्हणून एलईडी दिव्यांचा वापर महापालिकेने सुरू केला आहे. याशिवाय कार्यालयात कुणी नसताना दिवे आपोआप बंद होऊन विजेची बचत व्हावी, यासाठी काही कार्यालयांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सेन्सर लावण्यात आले असून, हा प्रयोग यशस्वीही झाला आहे.

 महापालिका भवनात ५० किलोवॉटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी ४८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सुरवातीची तीन वर्षे देखभाल दुरुस्तीचे काम सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी करणारी कंपनीच करणार आहे. उर्वरित आणखी चार वर्षे देखभाल दुरुस्तीचे काम प्रकल्प उभारणाऱ्या कंपनीला चार लाख रुपये वार्षिक खर्च महापालिका देणार आहे. आगामी पाच वर्षांत वीज बिलापोटी जेवढी रक्‍कम महापालिकेला द्यावी लागणार आहे, ती सौरऊर्जा प्रकल्पातून वसूल होणार आहे. पुढील दोन वर्षे महापालिकेच्या वीज बिलाची बचत होणार आहे.

महापालिकेने यापूर्वी इ क्षेत्रीय कार्यालयात साडेनऊ लाख रुपये खर्चून १० किलोवॉटचा प्रकल्प उभारला आहे. सध्या महापालिका भवनात हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. गेल्या वर्षी ४८ लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. यंदाच्या वर्षी आणखी ४५ लाखांची तरतूद केली आहे. टप्प्याटप्प्याने महापालिकेच्या इतर इमारतींमध्येही सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
-  प्रवीण तुपे,  सह शहर अभियंता-विद्युत विभाग

Web Title: pimpri news pcmc Solar Power Project