प्रवाशांच्या तुलनेत गाड्या कमीच 

ज्ञानेश्‍वर बिजले
मंगळवार, 27 जून 2017

पिंपरी - पिंपरी चिंचवडमधील प्रवाशांची संख्या गेल्या दहा वर्षांत अडीच पटीने वाढली. त्या प्रमाणात गाड्या वाढल्या नाहीत. वाढलेल्या गाड्या प्रवाशांच्या गर्दीच्या मार्गावरून धावू लागल्याने, शहराच्या नवीन विस्तारलेल्या भागात, हद्दीलगतच्या गावांत प्रवाशांना पुरेशी बससेवा उपलब्ध नाही. त्यामुळे, नवीन बसमार्ग करून गाड्यांची संख्या वाढविण्याची प्रवाशांची मागणी आहे. 

पिंपरी - पिंपरी चिंचवडमधील प्रवाशांची संख्या गेल्या दहा वर्षांत अडीच पटीने वाढली. त्या प्रमाणात गाड्या वाढल्या नाहीत. वाढलेल्या गाड्या प्रवाशांच्या गर्दीच्या मार्गावरून धावू लागल्याने, शहराच्या नवीन विस्तारलेल्या भागात, हद्दीलगतच्या गावांत प्रवाशांना पुरेशी बससेवा उपलब्ध नाही. त्यामुळे, नवीन बसमार्ग करून गाड्यांची संख्या वाढविण्याची प्रवाशांची मागणी आहे. 

पीसीएमटी असताना नोव्हेंबर 2007 मध्ये प्रवाशांची संख्या दररोज 89 हजार 744 होती, तर पीएमपीचे मार्च 2017 मध्ये रोज दोन लाख 35 हजार 385 प्रवासी होते. म्हणजे प्रवाशांच्या संख्येत दहा वर्षांत एक लाख 45 हजारांनी वाढ झाली. त्या तुलनेत गाड्यांची संख्या 252 वरून 555 झाली. म्हणजे 303 गाड्या वाढल्या. त्यामध्ये भाडेतत्त्वावरील 284 गाड्यांचा समावेश आहे. पुण्यातून कात्रज, हडपसर, वारजे माळवाडी, शेवाळेवाडी अशा वेगवेगळ्या भागातून पिंपरी चिंचवडला येणाऱ्या 299 गाड्या रोज सुमारे तीन हजार फेऱ्या मारतात. मात्र, यातील बहुतेक गाड्या मुख्य मार्गावरून धावतात. जुन्या गाड्या मार्गावरच बंद पडण्याचे, तसेच नादुरुस्त असल्याने गाड्या बसआगारातच थांबवून ठेवल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा परिणाम रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांच्या संख्येवर होतो. 

वाढलेली प्रवासी संख्या लक्षात घेतल्यास, शहराचा विस्तार झाल्याचे दिसून येते. मात्र, नवे बसमार्ग सुरू करताना, विस्तारलेल्या परिसराऐवजी सध्या अस्तिस्वातील मार्गाचा विस्तार करण्यावरच भर देण्यात आला. त्यातच गेल्या काही वर्षांत पीएमपी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्याने, नवीन गाड्यांची खरेदी लांबणीवर पडली. त्यामुळे शहरात तसेच लगतच्या गावांत बससेवाच अपुरीच आहे. तेथील रहिवाशांना पर्यायी वाहन व्यवस्थेचा वापर करून मुख्य मार्गांवर येऊनच त्यांना पीएमपी बससेवा मिळू शकते. या प्रवाशांना त्यांच्या भागातून मुख्य मार्गांवर येण्यासाठी लहान आणि शटल पद्धतीच्या गाड्या उपलब्ध करून देण्याची आवश्‍यकता आहे. 

पीएमपी नवीन दोनशे मिनी बसगाड्या घेत असून, येत्या महिनाभरात त्या येण्यास सुरवात होईल. त्यापैकी किमान 80 गाड्या पिंपरी चिंचवडसाठी मिळणार आहेत. या गाड्या सध्याच्याच बसमार्गावर पाठविण्याऐवजी शहराच्या अंतर्गत भागात नवे बसमार्ग करून, त्यावर सुरू केल्यास प्रवाशांची सोय होऊ शकेल. 

Web Title: pimpri news pmp bus