पंतप्रधानांच्या भाषणाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

पिंपरी - पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्ष आणि शिकागो येथे स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या भाषणाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (ता.११) सकाळी अकरा वाजता विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या या उपक्रमाला शहरातील महाविद्यालयांनी भरभरून प्रतिसाद दिला. 

पिंपरी - पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्ष आणि शिकागो येथे स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या भाषणाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (ता.११) सकाळी अकरा वाजता विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या या उपक्रमाला शहरातील महाविद्यालयांनी भरभरून प्रतिसाद दिला. 

पंतप्रधानांचे भाषण देशातील सर्वच महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी ऐकावे, यासाठी परिपत्रक काढून सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पिंपरीतील संत तुकारामनगरमधील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील सुमारे २०० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. संगणक विभागाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, प्रा. संतोष चोबे, प्रा. अरुण सोनार, प्रा. रोहित बामणे, प्रा. शुभांगी जाधव, कमलेश देवरे, छाया जाधव यांनी संयोजन केले. 

पंतप्रधानांच्या भाषणानंतर विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण होते. 

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
विद्यार्थ्यांना पंतप्रधानांसोबत थेट संवाद साधता आला नाही; परंतु या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पंतप्रधान कळले. यानिमित्ताने महाविद्यालयीन तरुणाईशी ‘कनेक्‍ट’ राहता येते.
- स्वालेखा अत्तार, बी.ई. अंतिम वर्ष, संगणक अभियांत्रिकी विभाग

 भारतीय संस्कृती आणि टेक्‍नॉलॉजीचा मिलाप करून एक नवे तंत्रज्ञान विकसित करण्याविषयी पंतप्रधान मोदी यांचे विचार उपयुक्त ठरले. स्वामी विवेकानंद यांच्याप्रमाणे सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत, याची शिकवण त्यांच्या मार्गदर्शनातून मिळाली.
- सागर कोल्हे, द्वितीय वर्ष संगणक विभाग

पंतप्रधान मोदी हे तरुणांना एकसाथ पुढे घेऊन जात आहेत. स्वामी विवेकानंद यांचे विचार प्रत्येकाने अंगीकारले पाहिजेत. मोदी यांच्या भाषणातून स्वामीजींचे नवे पैलू उलगडले.
- ईशा खोत, बी.ई. अंतिम वर्ष, संगणक अभियांत्रिकी विभाग

स्वामी विवेकानंद यांच्याप्रमाणे संकल्पावर दृढ राहिले पाहिजे. त्यांची शिकवण अंगीकारून जगता आले पाहिजे, याची जाण पंतप्रधानांच्या भाषणातून झाली.
- रोहित आगरवाल, द्वितीय वर्ष, संगणक अभियांत्रिकी विभाग

Web Title: pimpri news Prime Minister's speech student