चिंचवडमध्ये आजपासून गृहप्रकल्पांचे भव्य प्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

पिंपरी - रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचे विविध पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करून देणारा ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ आजपासून चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटरमध्ये सुरू होत आहे. आयकर आयुक्त संदीप गर्ग यांच्या हस्ते सकाळी ११.३० वाजता उद्‌घाटन होणार आहे. 

पिंपरी - रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचे विविध पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करून देणारा ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ आजपासून चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटरमध्ये सुरू होत आहे. आयकर आयुक्त संदीप गर्ग यांच्या हस्ते सकाळी ११.३० वाजता उद्‌घाटन होणार आहे. 

पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील प्रकल्प, या प्रकल्पांमधील सुविधा, फायद्याची गुंतवणूक, परिसराचा विकास अशा विविध मुद्यांवर या एक्‍स्पोमध्ये माहिती मिळणार आहे. बांधकाम व्यावसायिकांकडून दिल्या जाणाऱ्या सवलती आणि ऑफर्सचाही लाभ घेण्याची ही संधी आहे. दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात  प्लॉट, बंगलो, स्टुडिओ अपार्टमेंट्‌स तसेच परवडणाऱ्या घरांपासून आलिशान घरापर्यंत सर्व काही असेल. शिवाय घरासोबत मिळणाऱ्या सुविधा, ॲमेनिटी, लोकेशन, आसपासचा परिसर याबाबत असलेल्या शंकांचे समाधान करण्यासाठी हा एक्‍स्पो प्रभावी ठरणार आहे.

एक्‍स्पोमध्ये साधारण २१ लाखांपासून पुढे फ्लॅट, तर ७ लाखांपासून पुढच्या किमतींचे प्लॉट पाहायला मिळतील. गृहखरेदीत रस असणाऱ्यांचे बजेट, आवड, सोय अशा प्रत्येक प्रश्‍नाचे योग्य उत्तर या एक्‍स्पोमधून मिळू शकेल. 

एक्‍स्पोमध्ये ५० हून अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या १२५ हून अधिक प्रकल्पांची माहिती उपलब्ध होणार आहे. प्रदर्शनात रविवारी श्‍वेता जुमानी व आनंद पिंपळकर यांची वास्तूसंदर्भात व्याख्यानेही होणार आहेत.

सकाळ वास्तू प्रॉपर्टी एक्‍स्पो
कधी - १० व ११ फेब्रुवारी 
कुठे - ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटर, सायन्स पार्कजवळ, चिंचवड 
केव्हा - सकाळी ११ ते रात्री ८ 
रविवारची (ता. ११) व्याख्याने 
श्‍वेता जुमानी - सकाळी ११
विषय - वास्तू आणि अंकशास्त्र 
आनंद पिंपळकर - सायंकाळी ५.३० 
विषय - आपली वास्तू, आनंदी वास्तू 
प्रवेश व वाहनतळ सुविधा विनामूल्य

Web Title: pimpri news pune news chinchwad home project exhibition