महापालिकेचे यंदाचे उत्पन्न समाधानकारक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

पिंपरी - महापालिकेला २०१७-१८ या आर्थिक वर्षात आतापर्यंत दोन हजार ४२३ कोटी रुपये उत्पन्न मिळाले असून, अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत ते समाधानकारक असल्याचे मत महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी व्यक्त केले. या आर्थिक वर्षातील पहिल्या दहा महिन्यांत म्हणजे जानेवारीपर्यंत भांडवली कामावरील खर्च सुमारे तीस टक्के झाला आहे.

पिंपरी - महापालिकेला २०१७-१८ या आर्थिक वर्षात आतापर्यंत दोन हजार ४२३ कोटी रुपये उत्पन्न मिळाले असून, अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत ते समाधानकारक असल्याचे मत महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी व्यक्त केले. या आर्थिक वर्षातील पहिल्या दहा महिन्यांत म्हणजे जानेवारीपर्यंत भांडवली कामावरील खर्च सुमारे तीस टक्के झाला आहे.

पालिकेने या आर्थिक वर्षात दोन हजार ७३३ कोटी रुपये जमा होतील असे गृहीत धरले आहेत. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये ३१० कोटी रुपये मिळाल्यास यंदा अपेक्षित जमेपोटी पुरेशी रक्कम मिळेल. स्थानिक संस्था कर आता राज्य सरकारकडूनच मिळत आहे. तो यंदा १४७५ कोटी रुपये अपेक्षित होता. मात्र, जानेवारीपर्यंत १४८५ कोटी रुपये मिळाले असून, आणखी दोन महिन्यांतही राज्य सरकारकडून आणखी रक्कम मिळेल. त्यामुळे अर्थसंकल्पातील जमेची बाजू भक्कम झाली आहे. करसंकलनाच्या अपेक्षित ४६० कोटी रुपये जमेच्या तुलनेत आतापर्यंत २९१ कोटी रुपये; तर बांधकाम परवानगीतून ३४० कोटी रुपयांच्या तुलनेत ३१४ कोटी रुपये मिळाले आहेत. भांडवली जमेपोटी ७३ कोटी रुपये या वर्षी अपेक्षित होते.  आतापर्यंत ८६ कोटी मिळाले आहेत.

एकूण खर्च १,३७० कोटी
भांडवली कामांचा यंदाचा एकूण खर्च १ हजार २९४ कोटी रुपये गृहीत धरला आहे. आतापर्यंत ३८७ कोटी रुपयांची बिले दिली आहेत. शेवटच्या दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणात बिले येतात. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत भांडवली खर्चाची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढेल. महसुली खर्च जानेवारीअखेरीस ९८२ कोटी रुपये झाला आहे. आतापर्यंत भांडवली व महसुली मिळून एकूण खर्च १ हजार ३७० कोटी रुपये झाला, अशी माहिती लेखा विभागाने दिली.

पाणीपट्टीची ३२ कोटींची थकबाकी
महापालिकेला पाणीपट्टीतून मिळणारे वार्षिक उत्पन्न गेल्या पाच वर्षांत सरासरी २५ ते ३६ कोटी रुपये राहिले आहे. आज अखेर सुमारे ३२ कोटी रुपये पाणीपट्टी थकबाकी आहे. 

शहराची लोकसंख्या सध्या २० लाखांवर आहे. तुलनेने अधिकृत नळजोडधारक सुमारे एक लाख ४५ हजार आहे. शहरात बऱ्याच भागामध्ये सार्वजनिक नळांचा वापर नागरिक करतात. अनधिकृत नळजोडधारकांची संख्यादेखील मोठी आहे. 

मात्र त्यांचा शोध घेऊन, अनधिकृत नळजोड ठराविक दंड आकारून नियमित केल्यास महापालिका पाणीपट्टीच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. 

Web Title: pimpri news pune news municipal income