गुलाब फुलला

ज्ञानेश्‍वर वाघमारे
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

वडगाव मावळ - ‘व्हॅलेंटाइन डे’साठी गेल्या दहा दिवसांत मावळ तालुक्‍यातून सुमारे एक कोटी गुलाबांच्या फुलांची निर्यात झाली असून, येत्या पाच दिवसांत आणखी एक ते सव्वा कोटी फुलांची निर्यात होण्याची शक्‍यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निर्यातीत व दरात सुमारे पंधरा ते वीस टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी नोटाबंदीच्या आडून शेतकऱ्यांनी पिळवणूक झाली. त्यामुळे निर्यातीला फटका बसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यंदा मात्र अनुकूल हवामानामुळे दर्जेदार फुलांचे उत्पादन झाल्याने शेतकरी खूश आहेत.

मध्यंतरी ओखी वादळामुळे तसेच हवमानात चढउतार झाल्याने यंदाचा ‘व्हॅलेंटाइन डे’चा हंगाम हाती लागेल की नाही, अशी भीती फूल उत्पादकांमध्ये निर्माण झाली होती; परंतु त्यानंतर अतिशय अनुकूल हवामान निर्माण झाल्याने दर्जेदार फुलांचे उत्पादन निघत आहे. निर्यातीत साधारण १५ ते २० टक्‍क्‍यांची वाढ झाली असून, दरही चांगला मिळत आहे. त्यामुळे यंदाचा ‘व्हॅलेंटाइन डे’चा हंगाम फूल उत्पादकांसाठी अतिशय आशादायक आहे.
- शिवाजी भेगडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा फूल उत्पादक संघ

यंदा हवामानाने साथ दिल्याने नियोजनाप्रमाणे फुलांचे उत्पादन सुरू आहे. परदेशात फुलांना मागणीही चांगली आहे. देशांतर्गत बाजारपेठेतही यंदा फुलांना चांगला दर मिळेल, अशी आशा आहे.
- मल्हार ढोले, सचिव, तळेगाव फ्लोरिकल्चर पार्क सहकारी फूल उत्पादक संस्था

Web Title: pimpri news pune news Red Rose