सेंट ॲन्स स्कूलकडून डोनेशन आकारणी

Donation
Donation

पिंपरी - तळवडे-त्रिवेणीनगर येथील सेंट ॲन्स स्कूलने १९९८ ते २०१० यादरम्यान महापालिकेकडून विशेष बाब म्हणून करमाफीची सवलत मिळविली. मात्र, विशेष सवलत प्राप्त करूनही शाळेने डोनेशन आकारले आहे. ते नियमबाह्य असल्याने शाळेकडून दंडासहित कर वसूल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिगंबर गोरडे यांनी महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे केली.   

चिखली येथील दिगंबर वामन गोरडे यांनी शाळेविषयी माहिती अधिकारात मागविली. त्यानुसार ‘सेंट ॲन्स स्कूलचे अध्यक्ष सी. जे. फ्रान्सिस यांनी तत्कालीन आयुक्तांना शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ‘आम्ही डोनेशन घेत नाही. आम्हाला महापालिकेने करामध्ये सूट द्यावी.’ असा अर्ज केला होता. त्यासाठी शाळेने धर्मादाय आयुक्तांकडील नोंदणी, प्रमाणपत्र, शासन मान्यता पत्र, देणगी स्वीकारत नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते.

तत्कालीन आयुक्त अनिल डिग्गीकर यांनी २१ जून १९९९ महापालिका सभा ठराव क्र. ४०६२ नुसार शहरातील खासगी शैक्षणिक संस्था व वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्थांच्या मिळकतीकरता करमाफीच्या धोरणानुसार सेंट ॲन्स स्कूलला १ एप्रिल १९९८ पासून ते २०१० पर्यंत करमाफीची सवलत दिली. प्रत्यक्षात ही शाळा प्रत्येक विद्यार्थ्याकडून शिक्षण शुल्क व डोनेशन घेते, असा आरोप गोरडे यांनी केला आहे. 

गोरडे यांनी सादर केलेल्या शुल्क पावत्यानुसार वैष्णवी पवारकडून २०१० मध्ये बारा हजार रुपये, सानिया जगतापकडून १५ हजार रुपये आणि शशी शिंदेकडून २००९ मध्ये १० हजार घेतले आहेत. ६ ऑगस्ट २०११ मध्ये मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम १९४९ नुसार, शैक्षणिक व वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्थांना सूट देण्याची तरतूद नसल्याचे निदर्शनास आल्यावर महापालिकेने करमाफीची निर्णय रद्द केला व २०११ - १२ पासून पुन्हा करआकारणी सुरू केली; तसेच महापालिकेचे करआकारणी रजिस्टरमध्ये शाळेच्या बांधकामाची नोंद अनधिकृत असल्याचे आढळले. 

तत्कालीन आयुक्त डिग्गीकर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करून महापालिकेच्या कायद्यानुसार दंडासहित कर वसूल करावा. खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याबद्दल शाळेची मान्यता रद्द करण्याविषयी आयुक्त हर्डिकर व शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. 

शाळा झोपडपट्टीतील मुलांना शिक्षण देते. आम्ही कर भरतो की नाही, हा महापालिका आणि शाळेशी संबंधित विषय आहे.
- सी. जे. फ्रान्सिस, अध्यक्ष, सेंट ॲन्स स्कूल, त्रिवेणीनगर 

तत्कालीन आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयानुसार सेंट ॲन्स स्कूलचा कर माफ केला होता. मात्र, २०११ पासून शाळेने कर भरण्यास सुरवात केली. सध्या शाळेची पाच लाख ८९ हजार ८०२ रुपये शास्तिकरासह थकबाकी आहे. त्यासाठी शाळेला १ जानेवारी २०१८ ला नोटीस बजावली आहे.
- रेखा गाडेकर,  प्रशासन अधिकारी, करसंकलन विभाग महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com