पिंपरी मंडईत पाणी साचल्याने दुर्गंधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

पिंपरी -  येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत पावसाचे पाणी साचल्याने दुर्गंधी पसरली असून, मंडईत आवश्‍यक सोयी-सुविधांची वानवा आहे. येत्या काही दिवसांत या परिस्थितीत सुधारणा न झाल्यास आंदोलन करू, असा इशारा शिवशाही व्यापारी संघाने दिला आहे. 

संघटनेचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले, पिंपरी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पिंपरी मंडईची परिस्थिती गंभीर असून तेथे तत्काळ योग्य सोयी-सुविधा न दिल्यास परिस्थिती आणखी दयनीय होईल. तेथील गाळेधारक नियमितपणे कर भरतात. तरी सोयीकडे दुर्लक्ष केले जाते.

Web Title: pimpri news rain water in pimpri market