उपोषणाकडे नेत्यांनी फिरवली पाठ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

पिंपरी - कालबाह्य रिंगरोड रद्द करणे, घरे नियमित करावीत, पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण बरखास्त करावे, शंभर टक्के शास्तीकर माफ करावा, अशा विविध मागण्यांसाठी रिंगरोडबाधित नागरिकांनी गुरुवारी पिंपरीत भरपावसात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. ‘घर बचाव संघर्ष समिती’ला जाहीर पाठिंबा देऊनही राजकीय नेत्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरविली.

या वेळी नगरसेवक अभिषेक बारणे, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मारुती भापकर, माजी नगरसेवक रघुनाथ वाघ, राजेंद्र साळुंके, काँग्रेस कार्यकर्ते संदेशकुमार नवले, मयूर जैस्वाल आदींनी उपोषणकर्त्यांना मार्गदर्शन केले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सकाळी नऊ वाजल्यापासून उपोषणाला सुरवात झाली आहे. उपोषणात मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले आहेत. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. ‘आमची घरे नियमित करा, प्राधिकरण रद्द करा, घर आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, आमची घरे नियमित करा, रिंगरोड रद्द करा, अशा मजकुराचे फलक महिलांनी हातामध्ये घेतले आहेत.

भापकर म्हणाले, ‘‘हा देश अंहिसेला मानणाऱ्या महात्मा गांधींजीचा आहे. यामुळे आम्ही लोकशाहीच्या मार्गाने शांततेत आंदोलन करीत आहोत. मात्र, हा देश भगतसिंगांचाही आहे हेदेखील विसरून चालणार नाही. आमच्या आंदोलनाची दखल घेऊन जर कार्यवाही केली नाही तर मग आंदोलन आणखी तीव्र करू.’’

Web Title: pimpri news ringroad