कारप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद "सकाळ ऑटो एक्‍स्पो'चा समारोप 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

पिंपरी - कार घेण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या "सकाळ ऑटो एक्‍स्पो'ला समारोपाच्या दिवशी रविवारी (ता. 13) कारप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध नामवंत कंपन्यांच्या कारच्या फीचर्सची माहिती घेण्यासह कारप्रेमींनी कारचे थेट बुकिंगही केले. एकाच छताखाली कारच्या वेगवेगळ्या डिझाइन आणि फीचर्स कारप्रेमींना पाहायला मिळाले. 

चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटरमध्ये सकाळ माध्यम समूहाने दोनदिवसीय "ऑटो एक्‍स्पो'चे आयोजन केले होते. रविवार सुटीचा दिवस असल्याने बहुतांशी कारप्रेमींनी सहकुटुंब प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शनाच्या दोन दिवसांत चोखंदळ वाहनप्रेमींनी गाड्यांची माहिती घेतली. पिंपरी-चिंचवडकरांकडून ऑटो डिलर्सला उदंड प्रतिसाद लाभला आहे. 

घरासमोर एक आलिशान गाडी असावी, हे स्वप्न साकार करण्यासाठी ऑटो एक्‍स्पोतील सहभागी डिलर्सच्या प्रत्येक स्टॉलवर जाऊन वाहनांची माहिती घेत काहींनी बुकिंग केले. या एक्‍स्पोत विराज स्कोडा, बी. यू. भंडारी -फोक्‍सवॅगन, शरयू टोयाटो, शिव निसान, होंडा कार्स, माय कार मारुती आदी कंपन्या सहभागी झाल्या. एकाच छताखाली वेगवेगळ्या नामवंत कंपन्यांच्या कारची माहिती कारप्रेमींना मिळाली. त्यासोबतच त्यांच्या किमती आणि ईएमआय घेण्यासंबंधीची माहिती देण्यात आली. याशिवाय, डिझाइन आणि फीचर्सच्या बाबतीत कारचे ब्रॅंड कारप्रेमींच्या पसंतीस उतरले. थेट कारसाठी कर्जाची सुविधाही उपलब्ध असल्याने फीचर्ससह नामवंत कार खरेदी करण्याचे स्वप्न साकार करता येणार असल्याचे कारप्रेमींनी सांगितले. 

कारप्रेमी म्हणतात... 

सकाळच्या "ऑटो एक्‍स्पो' प्रदर्शनामुळे अनेक गाड्यांची एकाच ठिकाणी माहिती घेण्याची संधी मिळाली. वैविध्यपूर्ण रंगसंगती आणि बजेटमधील कार उपलब्ध आहेत. 
-विद्या पवार 

ऑटो एक्‍स्पो प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेकांनी आपले स्वप्न साकार केले. या प्रदर्शनात कारविषयक उपयुक्त माहिती मिळाली. 
-ऐश्‍वर्या सायकर 

Web Title: pimpri news sakal auto expo