संस्कार ग्रुपची मालमत्ता जप्त 

रवींद्र जगधने
गुरुवार, 18 जानेवारी 2018

पिंपरी - दामदुप्पट व्याजाच्या आमिषाला बळी पडून गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या कोटी रुपयांच्या ठेवी परत न करणाऱ्या संस्कार ग्रुपची सुमारे ४० कोटींची मालमत्ता दिघी पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच या मालमत्तेच्या लिलावाबाबत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

पिंपरी - दामदुप्पट व्याजाच्या आमिषाला बळी पडून गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या कोटी रुपयांच्या ठेवी परत न करणाऱ्या संस्कार ग्रुपची सुमारे ४० कोटींची मालमत्ता दिघी पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच या मालमत्तेच्या लिलावाबाबत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

संस्कार ग्रुपविरोधात दिघी पोलिस ठाण्यात जानेवारी २०१७ मध्ये एका गुंतवणूकदाराच्या तक्रारीवरून पहिला गुन्हा दाखल झाला. या तक्रारीत फसवणुकीची रक्कम सुमारे २५ लाख होती. मात्र, आत्ता १६० गुंतवणूकदारांच्या तक्रारीवरून ही रक्कम आठ कोटींच्या वर पोचली आहे. या प्रकरणात संस्थापक वैकुंठ कुंभार, राणी कुंभार यांना सत्र व उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळूनही ते एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत आहेत. मात्र, त्या वेळी संस्कार ग्रुपचे पदाधिकारी अभिषेक घारे, राजू बुचडे व सुरेखा शिवले यांचा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. तर नुकतीच अटक केलेल्या संस्कारच्या पदाधिकारी कमल शेळके यांची रवानगी सध्या कारागृहात आहे. 

तपासाला गती
संस्कार ग्रुपच्या तपासाचा प्रस्ताव अगोदरच अधिक गुन्हे तपासासाठी असल्याने आर्थिक गुन्हे शाखेने नाकारल्यानंतर उपायुक्तांनी दिघी पोलिस ठाण्याचे निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र काळे यांच्याकडे पुढील तपास दिला. काळे यांनी तपासादरम्यान जमीन, मालमत्ता जप्त करून व कमल शेळके यांना अटक केली. 

गुंतवणूकदारांनी स्थापला ट्रस्ट 
गुंतवणूकदारांनी समर्थ वेल्फेअर ट्रस्टची स्थापना केली आहे. त्याच्या अध्यक्षपदी वैशाली साळुंखे, उपाध्यक्षपदी रूपा गिलबिले, सचिवपदी वनिता बुर्डे, खजिनदारपदी ज्योती वाडेकर, सदस्य म्हणून ज्योती पुजारी, ज्योती पारशेट्टी, अस्मिता मोरे यांची निवड झाली. ट्रस्टच्या माध्यमातून गुंतवणुकीचे पैसे परत मिळविण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे रूपा गिलबिले यांनी सांगितले. 

संस्कार ग्रुपची आतापर्यंत जप्त केलेली मालमत्ता गुंतवणूकदारांच्या रकमेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या नागरिकांनी आपली तक्रार दिघी पोलिस ठाण्यात द्यावी. अन्यथा, लिलाव झाल्यास आपल्याला मोबदल्यापासून वंचित राहावे लागेल. तसेच या प्रकरणाच्या दोन्हीही मुख्य आरोपींना लवकरच अटक केली जाणार आहे. 
- राजेंद्र काळे, निरीक्षक, गुन्हे दिघी पोलिस ठाणे. 

जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रस्ताव
पोलिसांकडे १६० गुंतवणूकदारांची तक्रार व ती एकूण रक्कम आठ कोटी 
 संस्कार ग्रुपची राज्यातील सर्व जमिनींची माहिती मिळविण्यासाठी आणि कोणत्याच जमिनीचे कोठेच व्यवहार होणार नाहीत. यासाठी दिघी पोलिसांचा नोंदणी महानिरीक्षकांना पत्रव्यवहार, त्यापैकी ४८ उपनिबंधकांची उत्तरे मिळाली. 
 मालमत्तेच्या लिलावासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रस्ताव
 संस्कार ग्रुपमधील सर्व संगणकाच्या हार्डडिक्‍स फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी  
 लवकरच शासकीय ऑडिटरची नेमणूक
 या प्रकरणात झाली प्रशासकाची नेमणूक 
 अनेकांची मूळ कागदपत्रे संस्कार ग्रुपकडे असल्याचे गुंतवणूकदारांचे म्हणणे

पदाधिकाऱ्यांची जप्त मालमत्ता 
 राणी कुंभार - एक कार
 कमल शेळके - एक कार, जागा - १६५० चौरस फूट
 अभिषेक घारे - एक कार, एक दुचाकी 
 राजू बुचडे - एक कार, तीन दुचाकी एक लाख ६० हजार किमतीचे मोबाईल दोन 

Web Title: pimpri news Sanskar group assets seized crime