स्पाइन रस्ताबाधितांचा तिढा सुटला

मिलिंद वैद्य
सोमवार, 24 जुलै 2017

पिंपरी - स्पाइन रस्त्यामुळे बाधित होणाऱ्या प्राधिकरणाच्या सेक्‍टर दोनमधील १२८ कुटुंबांचे पुनर्वसन सेक्‍टर ११ मध्ये करण्यास प्राधिकरण सभेने मंजुरी दिली. त्यामुळे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग, पुणे-मुंबई महामार्ग व द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या स्पाइन रस्ता पूर्णत्वाचा आणि त्यास अडथळा ठरणाऱ्या घरांच्या पुनर्वसनाचा तिढा सुटला आहे.

महापालिकेने या जागेसाठी प्राधिकरणाकडे १६ कोटी ५२ लाख रुपये अगोदरच भरले आहेत. आणखी ७ हजार ४०० चौरस मीटर अतिरिक्त जागेची मागणी प्राधिकरणाकडे केली आहे. त्यालादेखील प्राधिकरणाने अनुकूलता दर्शविली असून,पूर्ण प्रस्ताव सरकारकडे मंजुरीस पाठविण्यात येणार असल्याचे प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी सांगितले. 

प्राधिकरणाने सेक्‍टर २ मधील बाधितांच्या पुनर्वसनासाठी सेक्‍टर ११ मधील १४ हजार ७८४ चौरस मीटर जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याला प्राधिकरण सभेने मंजुरी दिली असून, राज्य सरकारकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात येत आहे.
- सतीशकुमार खडके, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राधिकरण

दृष्टिक्षेपात स्पाइन रस्ता 
एकूण लांबी ३४ किलोमीटर; ३३० मीटर महापालिका; उर्वरित प्राधिकरण हद्द
मोशीतील वखार महामंडळ ते निगडीतील भक्ती-शक्ती चौक जोडणार
सेक्‍टर २ मधील १२८ कुटुंबांचा आक्षेप, दहा वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले
बाधितांच्या पुनर्वसनाच्या निर्णयामुळे सरसकट स्पाइन रस्ता पूर्ण होणार
नाशिक, मुंबईकडे जाणारी वाहतूक पिंपरी-चिंचवड शहराबाहेरून वळवणार
निगडीतील भक्ती-शक्ती चौक व पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाला जोडण्यासाठी मुकाई चौकमार्गे रस्ता तयार करण्याचे काम महापालिकेकडून सुरू

Web Title: pimpri news Spine road