पिंपरी शहरात स्वाइन फ्लूचे आठ महिन्यांत ४१ बळी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

पिंपरी - ढगाळ वातावरणामुळे स्वाइन फ्लूचा धोका वाढला आहे. परिणामी गेल्या आठ महिन्यात पिंपरी- चिंचवड शहरात तब्बल ४१ जणांचा स्वाइन फ्लूने बळी गेला आहे. यामध्ये आठ महिन्यांच्या चिमुकलीसह एका ६० वर्षांच्या रुग्णांचा समावेश आहे. 

शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढत आहेत. जानेवारी ते सप्टेंबर  २०१७ या कालावधीत आठ लाख ३२ हजार ६७४ रुग्णांची तपासणी केली. त्यापैकी ७६७४ जणांना ‘टॅमी फ्लू’ दिले. स्वाइन फ्लूची लक्षणे असलेले ७३ हजार ४१८ रुग्ण आढळले. त्यातील ६६९ रुग्णांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले. त्यातील ३४४ रुग्णांना स्वाइन फ्लू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यातील ४१ जणांचा बळी गेला.

दरम्यान, सध्याचे वातावरण स्वाइन फ्लूच्या फैलावास पोषक असून नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे नागरिकांनी टाळून स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस घेणे गरजेचे आहे. रुग्णांची वाढती संख्या हे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान आहे. स्वाइन फ्लूविषयी अजूनही म्हणावी तशी जनजागृती व प्रबोधन झालेले दिसत नाही. स्वाइन फ्लू रुग्णांसाठी महापालिकेच्या वायसीएम आणि वेगवेगळ्या नऊ खासगी रुग्णालयांमध्ये ‘विशेष कक्ष’ स्थापन केलेले आहेत. 

दर आठवड्याला आढावा
स्वाइन फ्लूबाधित, तसेच व्हेंटिलेटरील रुग्णांची नोंद दररोज ठेवावी. महापालिका आयुक्तांनी दर आठवड्याला त्याचा आढावा घ्यावा. महापालिका स्तरावर स्वाइन फ्लूने खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्यास त्याचे ‘डेथ ऑडिट’ महापालिकेच्या आरोग्य विभागाने करावे. नेमकी कारणे काय? याविषयी माहिती संकलित करावी, असे आदेश आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले आहेत, अशी माहिती स्वाइन फ्लू कक्ष समन्वयक डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.

Web Title: pimpri news swine flu