स्वाइन फ्लूचा 56 वा बळी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

पिंपरी - शहरात स्वाइन फ्लूची साथ रोखण्यात महापालिका प्रशासनाला अपयश येत आहे. स्वाइन फ्लूमुळे आतापर्यंत 56 जणांचा बळी घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात जुन्नर येथील 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिला उपचारासाठी 20 सप्टेंबरला भोसरी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्याच दिवशी तिच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्याचा अहवाल 21 सप्टेंबरला मिळाला. त्यामध्ये स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या महिलेला पुढील उपचारासाठी चव्हाण रुग्णालयात हलविले. सोमवारपासून (ता. 9) ती कृत्रिम श्‍वासोच्छ्वासावर होती. मंगळवारी (ता.

पिंपरी - शहरात स्वाइन फ्लूची साथ रोखण्यात महापालिका प्रशासनाला अपयश येत आहे. स्वाइन फ्लूमुळे आतापर्यंत 56 जणांचा बळी घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात जुन्नर येथील 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिला उपचारासाठी 20 सप्टेंबरला भोसरी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्याच दिवशी तिच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्याचा अहवाल 21 सप्टेंबरला मिळाला. त्यामध्ये स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या महिलेला पुढील उपचारासाठी चव्हाण रुग्णालयात हलविले. सोमवारपासून (ता. 9) ती कृत्रिम श्‍वासोच्छ्वासावर होती. मंगळवारी (ता. 10) उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. 

शहरात एक जानेवारीपासून आतापर्यंत चारशे रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, त्यातील 334 जणांना उपचार करून सोडण्यात आले. दहा जणांवर उपचार सुरू आहेत.

Web Title: pimpri news swine flu