स्वाइन फ्लू, मलेरिया नियंत्रणात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

पिंपरी - शहरामध्ये सध्या स्वाइन फ्लू, चिकुनगुनिया, मलेरिया आदी साथीच्या आजारांचे रुग्ण घटले आहेत. डेंगीच्या संशयित रुग्णांमध्ये मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते जून या ६ महिन्यांच्या कालावधीत डेंगीचे १६८ संशयित रुग्ण आढळले होते. तर, यंदा याच कालावधीत २२८ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे डेंगीच्या रुग्णांबाबत प्रामुख्याने दक्षता घेण्याची गरज आहे. 

पावसाळ्यामध्ये साथीचे आजार जास्त बळावतात. त्यांच्यावर वेळीच नियंत्रण मिळविले नाही, तर त्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढते. गेल्या वर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांमध्ये तापाचे ३३ हजार ६३३ रुग्ण आढळले होते. यंदा गेल्या सहा महिन्यांत तापाचे ३१ हजार ६८६ रुग्ण आढळले आहेत.

डेंगीच्या संशयित रुग्णांत वाढ   
डेंगीने २०१७ मध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्याशिवाय, जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत १६८ संशयित रुग्ण आढळले होते. तर, ३ जणांना लागण झाली होती. यंदा गेल्या सहा महिन्यांमध्ये २२८ संशयित रुग्ण आढळले आहेत. मात्र, त्यामध्ये अद्याप कोणालाही लागण झाली नसल्याची माहिती महापालिका वैद्यकीय विभागातर्फे मिळाली. 

सहा महिन्यात एक मृत्यू
स्वाइन फ्लूने २०१७ मध्ये तब्बल ६१ जणांचा मृत्यू झाला होता. यंदा मात्र गेल्या सहा महिन्यांमध्ये या आजाराने फक्त एकाचा मृत्यू झाला आहे. लागण झालेले ३ रुग्ण आढळले आहेत. ६१ जणांच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तर, २ हजार ९५८ जणांना टॅमी फ्लू गोळ्या देण्यात आल्या. 

पावसाळ्यात होणाऱ्या विविध साथीच्या आजारांवर नियंत्रण राहावे, यासाठी महापालिकेतर्फे आवश्‍यक उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी ताप आल्यानंतर महापालिका रुग्णालयांमध्ये तपासून डेंगीची लागण झाली नसल्याबाबत खात्री करावी. डेंगीचा संशयित रुग्ण आढळल्यास महापालिका वैद्यकीय विभागाला कळवावे. महापालिका रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. डास-अळ्यांच्या नियंत्रणासाठी आवश्‍यक औषध फवारणी, कंटेनर सर्वेक्षण सुरू आहे.
- डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी

Web Title: pimpri news Swine Flu Malaria Control