स्वच्छतागृहाच्या जागेची विक्री?

रवींद्र जगधने
गुरुवार, 29 मार्च 2018

पिंपरी - साई चौकातील स्वच्छतागृह महापालिका प्रभागाने ठराव करून पाडले. तेथे वाचनालय बांधण्याचे नियोजन आहे. मात्र, स्वच्छतागृहाची जागा व्यापाऱ्याला कोटींच्या भावात विकण्याचा प्रयत्न स्थानिक लोकप्रतिनिधीच्या मध्यस्थीने सुरू असल्याची चर्चा आहे. दरम्यान, अयप्पा मंदिरामागील स्वच्छतागृह नुकतेच पाडले होते. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

पिंपरी कॅम्प, पिंपरीगाव परिसरात अनेक स्वच्छतागृहे रातोरात गायब झाली असून, तेथे घरे व दुकाने थाटली आहेत. राजकीय दबावापोटी महापालिका प्रशासनही संबंधितांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवत नाही. पिंपरी कॅम्प शहराची मध्यवर्ती बाजारपेठ आहे. तेथे शहरासह उपनगरातील नागरिक येथे येतात. अशा ठिकाणी स्वच्छतागृहाची गरज आहे. ते नसल्याने कुचंबणा होते. महिला स्वच्छतागृह नाही. परिसरातील स्वच्छतागृहे राजकीय पुढाऱ्यांच्या मदतीने पाडली जात असून, आर्यसमाज मंदिर चौक व रिव्हर रस्त्यावरील स्वच्छतागृहे गायब होण्याच्या मार्गावर आहेत.

पिंपरीतील स्वच्छतागृहांची माहिती अधिकारात माहिती मागवली होती; परंतु ती देण्यास पालिका प्रशासन टाळाटाळ करत आहे. स्वच्छतागृहांच्या जागा हडपण्यामागे मोठ्या राजकीय पुढाऱ्यांचा हात आहे. स्वच्छतागृह गायबप्रकरणी आयुक्त व मुख्यमंत्र्यांकडे चौकशीसाठी मागणी केली आहे.
- अब्दुल शेख, सामाजिक कार्यकर्ते 

पिंपरीगावातील भैरवनाथ मंदिराशेजारी, अशोक टॉकीज चौक, माउली टी चौक, तपोवन मंदिर समोर, शगुन चौक, साई चौक, जय हिंद कॉलेज चौक, नाणेकर कॉम्प्लेक्‍स चौक आदी परिसरातील पाच वर्षांपूर्वी स्वच्छतागृहे पाडली आहेत. महापालिकेने स्वच्छतागृह पाडणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छतागृहे बांधावीत, जेणेकरून विद्यार्थी व ज्येष्ठांची कुचंबणा होणार नाही. 
- अमर कापसे, अध्यक्ष, जाणीव फाउंडेशन  

पिंपरीतील काही स्वच्छतागृहे मी पदभार स्वीकारण्याच्या अगोदर गायब झाली आहेत. नुकतेच पाडलेले अयप्पा मंदिरामागील स्वच्छतागृहाबाबत पिंपरी ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 
- संजय कुलकर्णी, सहायक आरोग्याधिकारी, ‘ग’ प्रभाग

Web Title: pimpri news toilet place sailing