टोलमाफीचा लाभ घेतला हजारोंनी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

सोमाटणे - मुंबईतील गणेशभक्तांना कोकणात गणेश उत्सवास जाण्यासाठी २३ ते २५ ऑगस्टदरम्यान द्रुतगती मार्गासह सर्वच मार्गांवर टोलमध्ये सूट देण्यात आली होती. 

मुंबई-गोवा मार्गावर वळणाचे रस्ते व मोठे घाट असल्याने इंधन व वेळेत होणारा अपव्यय टाळण्यासाठी अनेक कोकणवासी मुंबईकर गणेशभक्तांनी द्रुतगती मार्गाने पुणे व तेथून पुढे कोकणात जाण्यासाठी बंगळूर महामार्गाला अधिक पसंती दिली. त्यामुळे २३ ते २५ ऑगस्टदरम्यान द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. द्रुतगती मार्गावरील खालापूर व उर्से टोलनाका येथे संबंधित विभागाकडून या गणेशभक्तांना टोलमुक्तीसाठी सहकार्य करण्यात आले होते. 

या टोलमाफीचा लाभ कोकणातील हजारो गणेशभक्तांनी घेतला. टोल भरण्याचा वेळ वाचल्याने दोन्ही टोल नाक्‍यावर तीन दिवस वाहतूक कोंडी झाली नाही.

Web Title: pimpri news toll