चुकीच्या धोरणामुळे महिलेचा बळी - लांडे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

पिंपरी - राजकीय श्रेयासाठी भाजप सरकारने बांधकामे नियमित करण्याचा देखावा केला. हा प्रश्न असाच घोळत ठेवण्यासाठी जाचक अटी-शर्ती लादून सामान्यांची बोळवण केली. त्यामुळे अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला विरोध करताना महिलेचा बळी गेला. याला सरकार, पालिका प्रशासन आणि महापालिकेतील सत्ताधारी जबाबदार आहेत, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते विलास लांडे यांनी केला. नियमितीकरणाला मूर्त स्वरूप येईपर्यंत पालिकेने कारवाईला स्थगिती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

लांडे म्हणाले, ""महापालिकेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 65 हजार, तसेच एमआयडीसी, नवनगर विकास प्राधिकरणाचे क्षेत्र, रेड झोन आदी भागातील मिळून जवळपास दीड लाखाहून अधिक अनधिकृत बांधकामे आहेत. महापालिका विरुद्ध लालजी वंजारी, तसेच जयश्री डांगे विरुद्ध महापालिका अशा दोन याचिका न्यायालयात दाखल आहेत. न्यायालयाने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सीताराम कुंटे समितीच्या अहवालानुसार बांधकामे नियमित निर्णय घेतला. मात्र, तो सखोल अभ्यास या प्रश्नावर झाला नाही. जाचक अटी-शर्ती लादल्याने सामान्यांनी बांधकाम नियमितीकरणाकडे पाठ फिरवली. सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांकडे अधिकारी काणाडोळा करतात. शास्तिकराचे ओझे शहरवासीयांच्या माथी आहे. 

आता तरी जागे व्हा ! 
शहरातील बांधकामे रोखण्यासाठी नियोजन नाही. आतापर्यंतची सर्व बांधकामे नियमित करून भविष्यात ती होणार नाहीत, यासाठी पालिकेने उपाययोजना करावी व महिलेच्या बलिदानातून तरी जागे व्हावे, असे आवाहन विलास लांडे यांनी केले.

Web Title: pimpri news vilas lande women