कौटुंबिक वादातून वाकडमध्ये तरुणाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

पिंपरी - विषारी औषध प्राशन करून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. २५) सकाळी वाकड येथे उघडकीस आली. अविनाश संभाजी पवार (वय ३५, रा. बेलठिकानगर, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. 

पोलिस उपनिरीक्षक हरीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगलनगर, वाकड येथील श्रीकृष्ण कॉलनी नंबर ४, रॉयल बेकरीसमोर एकजण बेशुद्ध पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यास त्वरित रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. 

मृत व्यक्तीकडे सापडलेल्या कागदपत्रांवरून त्याची ओळख पटली आहे. कौटुंबिक कारणातून आपण आत्महत्या करीत असल्याचे अविनाश याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. अधिक तपास वाकड पोलिस करीत आहेत.

Web Title: pimpri news Youth commits suicide due to family dispute